लई भारी! मोबाईलवरून कंट्रोल करता येणार हा टेबल फॅन; ही कंपनी भारतात घेऊन येऊ शकते स्मार्ट फॅन

By सिद्धेश जाधव | Published: August 7, 2021 07:41 PM2021-08-07T19:41:47+5:302021-08-07T19:42:09+5:30

Mi Standing Fan 2 फॅन मोबाईल किंवा टॅबलेटमधील अ‍ॅपच्या माध्यमातून नियंत्रित करता येईल.  

Xiaomi india hinted mi standing fan 2 india launch soon   | लई भारी! मोबाईलवरून कंट्रोल करता येणार हा टेबल फॅन; ही कंपनी भारतात घेऊन येऊ शकते स्मार्ट फॅन

लई भारी! मोबाईलवरून कंट्रोल करता येणार हा टेबल फॅन; ही कंपनी भारतात घेऊन येऊ शकते स्मार्ट फॅन

Next

शाओमी फक्त स्मार्टफोन निर्माता कंपनी नाही, ही चीनी कंपनी अनेक स्मार्ट गॅजेट्स लाँच करत असते. या स्मार्ट गॅजेट्समध्ये अनेक गृहपयोगी वस्तूंचा समावेश आहे. यातील बरेचशे स्मार्ट गॅजेट्स Xioami आपल्या गृह मार्केट चीनपुरते लाँच करते. पण आता कंपनीने आपल्या अधिकृत Telegram चॅनेलवर सांगितले आहे कि कंपनी आपला स्मार्ट फॅन - Mi Smart Standing Fan 2 भारतात लाँच करण्याची योजना बनवत आहे. हा फॅन याआधी चीनमध्ये लौंच झाला आहे.  

Xiaomi च्या भारतीय Telegram अकॉउंटवर कंपनीने एक पोस्टच्या माध्यमातून सर्वे फॉर्म शेयर केला आहे. पोस्टमध्ये शाओमी भारतीय फॅन मार्केटमध्ये एंट्री करण्याची योजना बनवत आहे आणि त्यासाठी चाहत्यांची प्रतिक्रिया हवी आहे, असे लिहिण्यात आले आहे. कंपनीने यासाठी एक सर्वे फॉर्म देखील शेयर केला आहे. या फॉर्मच्या थम्बनेलमध्ये Mi Smart Standing Fan 2 दिसत आहे. यावरून अंदाज लावला जात आहे कि हा फॅन भारतात लवकरच सादर होऊ शकतो. Xiaomi आपला आगामी Mi Smart Standing Fan 2 दुसऱ्या नावाखाली लाँच करू शकते. तसेच हा स्मार्ट फॅन सप्टेंबरच्या आसपास होणाऱ्या वार्षिक स्मार्टर लिविंग इव्हेंटमध्ये लाँच केला जाऊ शकतो.  

Mi Standing Fan 2 अ‍ॅल्यूमीनियम आणि एबीएस प्लास्टिकपासून बनवण्यात आला आहे. या 3.2 किलो वजन असलेल्या या स्मार्ट फॅनमध्ये 7 पाती आहेत. हा फॅन कमी आवाजसह जास्त हवा देतो. यात 100 स्पीड लेवल देण्यात आल्या आहेत. हा फॅन मोबाईल किंवा टॅबलेटमधील अ‍ॅपच्या माध्यमातून कंट्रोल करता येईल. अ‍ॅपमधून हा फॅन बंद आणि चालू करता येईल. यात चाइल्ड लॉक फिचर देखील आहे. विशेष म्हणजे हा फॅन Google आणि Alexa व्हॉईस असिस्टंटच्या माध्यमातून देखील कंट्रोल करता येईल.  

Web Title: Xiaomi india hinted mi standing fan 2 india launch soon  

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.