अरे व्वा! YouTube च्या अॅडपासून सुटका, कसं मिळवाल Premium Subscription तेही मोफत? जाणून घ्या...
By ऑनलाइन लोकमत | Published: June 8, 2022 03:41 PM2022-06-08T15:41:52+5:302022-06-08T15:47:25+5:30
यूट्यूब या लोकप्रिय व्हिडिओ स्ट्रिमिंग प्लॅटफॉर्मवर तुम्ही जेव्हा एखादा व्हिडिओ पाहत असता तेव्हा येणाऱ्या अॅडमुळे तुम्हीही वैतगता का? मग आता एक खूशखबर आहे.
नवी दिल्ली-
यूट्यूब या लोकप्रिय व्हिडिओ स्ट्रिमिंग प्लॅटफॉर्मवर तुम्ही जेव्हा एखादा व्हिडिओ पाहत असता तेव्हा येणाऱ्या अॅडमुळे तुम्हीही वैतगता का? मग आता एक खूशखबर आहे. यूट्यूबवर दिसणाऱ्या अॅड्सपासून तुम्ही स्वत:ची सुटका करून घेऊ शकता. शाओमी इंडियानं यूट्यूबसोबत एक अनोखा करार केला आहे. या करारानुसार शाओमीच्या काही स्मार्टफोन्समध्ये ग्राहकांना तीन महिन्यासाठी मोफत यूट्यूब प्रीमिअम मेंबरशिप देण्यात येणार आहे.
"आमच्या ग्राहकांना अॅड फ्री कन्टेंट आणि ऑफलाइन कंन्टेंट उपलब्ध करुन देण्याच्या उद्देशातून पात्र ग्राहकांना तीन महिन्यांसाठी मोफत यूट्यूब प्रीमिअमचं सब्सक्रिप्शन देण्यात येणार आहे", असं शाओमी इंडियानं जाहीर केलेल्या निवेदनात नमूद करण्यात आलं आहे. YouTube Premium हा व्हिडिओ स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मचा एक प्रीमियम पर्याय आहे ज्यातून युझर्सना जाहिरात-मुक्त स्ट्रीमिंग आणि ऑफलाइन डाउनलोड्सची सुविधा उपलब्ध होते. तसंच प्रीमिअर सब्सक्रिप्शनच्या माध्यमातून युझर्सना जाहिरात मुक्त म्युझिक ऐकण्याचीही सुविधा प्राप्त होते.
शाओमीच्या पुढील स्मार्टफोन्सचे ग्राहक तीन महिन्याच्या मोफत यूट्यूब प्रीमिअमचा लाभ घेऊ शकणार आहेत. यात Xiaomi 12 Pro, Xiaomi 11i, Xiaomi 11i HyperCharge and Xiaomi 11T यांचा समावेश आहे. हे स्मार्टफोन ज्यांच्याकडे आहेत त्यांना तीन महिन्यांसाठी यूट्यूब प्रीमिअम सबस्क्रिप्शन वापरता येणार आहे. दरम्यान Redmi Note 11, Note 11S, Note 11 Pro, Note 11 Pro+ आणि Xiaomi Pad 5 यूझर्सना दोन महिन्यांसाठी प्रीमिअम सबस्क्रिप्शन वापरता येणार आहे.
शाओमी इंडियाकडून उपलब्ध करुन देण्यात आलेलं हे खास प्रमोशन ३१ जानेवारी २०२३ पर्यंतच सुरू असणार आहे. तर प्रमोशन कालावधी संपल्यानंतरही यूट्यूब प्रीमिअम सबस्क्रिब्शन हवं असेल तर दरमहा १२९ रुपये युझर्सना भरावे लागणार आहेत.