भारतात धुमाकूळ घालण्यासाठी येतोय Xiaomi चा नवीन टॅबलेट, सॅमसंगच्या साम्राज्याला लागणार सुरुंग
By सिद्धेश जाधव | Published: March 29, 2022 08:01 PM2022-03-29T20:01:09+5:302022-03-29T20:01:47+5:30
Xiaomi भारतात नवीन टॅबलेटचा लाँच टीज केला आहे. कंपनी Mi Pad Series 5 सीरीज देशात सादर करू शकते.
Xiaomi भारतात स्मार्टफोन्ससाठी ओळखली जाते. परंतु अँड्रॉइड टॅबलेट सेगमेंटमध्ये अजूनही सॅमसंगचा दबदबा कायम आहे. त्यात आता रियलमी, नोकिया आणि मोटरलाची भर पडली आहे. लवकरच विवो आणि ओप्पो देखील या सेगमेंटमध्ये पदार्पण करतील. परंतु शाओमी आता भारतात एक नवीन टॅबलेट लाँच करण्याची तयारी करत आहे.
शाओमी टॅबलेट येतोय भारतात
शाओमी इंडियाचे प्रमुख मनू कुमार जैन यांनी ट्विटरवरून या टॅबलेटचा लाँच टीज केला आहे. तसेच कंपनीच्या वेबसाईटवर देखील यासाठी मायक्रोसाईट लाईव्ह करण्यात आली आहे. इथे दिलेल्या काउन्टडाऊनवरून 1 एप्रिलच्या लाँच डेटची माहिती मिळाली आहे. या दिवशी Mi Pad 5 टॅबलेट सीरिजमधील एक टॅब भारतात येऊ शकतो, जी याआधी जागतिक बाजारात आली आहे.
Xiaomi Pad 5 चे स्पेसिफिकेशन्स
Xiaomi Pad 5 मध्ये 11 इंचाचा WQHD+ ट्रूटोन डिस्प्ले मिळतो. हा डिस्प्ले 120Hz रिफ्रश रेट 1600 X 2560 पिक्सल रिजोल्यूशनला सपोर्ट करतो. प्रोसेसिंगसाठी यात कंपनीने क्वॉलकॉमच्या स्नॅपड्रॅगन 860 प्रोसेसरचा वापर केला आहे. यात 6GB पर्यंत RAM आणि 256GB पर्यंतची इनबिल्ट स्टोरेज मिळते.
या टॅबलेटमध्ये एलईडी फ्लॅशसह 13MP चा रियर कॅमेरा मिळतो. यातील फ्रंट कॅमेऱ्याचे रिजोल्यूशन 8MP आहे. Xiaomi Pad 5 मध्ये 8,720mAh ची मोठी बॅटरी 33W फास्ट चार्जिंग सपोर्टसह मिळते. जी 10 तास गेमिंग 16 तास व्हिडीओ प्लेबॅक देऊ शकते. कनेक्टिविटीसाठी यात Bluetooth 5, Wi-Fi आणि USB Type C पोर्ट मिळतो.