एका चार्जमध्ये 45 किलोमीटरची रेंज; Xiaomi ची स्पेशल एडिशन Mi Electric Scooter भारतात लाँच 

By सिद्धेश जाधव | Published: July 22, 2021 06:14 PM2021-07-22T18:14:38+5:302021-07-22T18:17:25+5:30

Mi Electric Scooter Pro 2 India Price: भारतातील सातव्या वर्धापन दिनानिमित्त Mi Electric Scooter Pro 2 Mercedes-AMG Petronas F1 Team Edition ही स्पेशल एडिशन इलेक्ट्रिक स्कूटर कंपनीने सादर केली आहे.

Xiaomi introduced the special edition mi electric scooter in india  | एका चार्जमध्ये 45 किलोमीटरची रेंज; Xiaomi ची स्पेशल एडिशन Mi Electric Scooter भारतात लाँच 

शाओमीच्या या इलेक्ट्रॉनिक स्कूटरमध्ये 600W इलेक्ट्रिक मोटर देण्यात आली आहे.

Next

शाओमीने भारतात आपली प्रीमियम इलेट्रॉनिक स्कूटर Mi Electric Scooter Pro 2 Mercedes-AMG Petronas F1 Team Edition सादर केली आहे. भारतातील सातव्या वर्धापन दिनानिमित्त ही स्पेशल एडिशन इलेक्ट्रिक स्कूटर कंपनीने सादर केली आहे. ही स्कुटर Mi Homes मध्ये प्रदर्शनास ठेवण्यात आली आहे. या स्कूटरमध्ये शाओमीने स्पोर्ट्स कारप्रमाणे एयरोडायनमिक डिजाइन दिली आहे. (Mi Electric Scooter Pro 2 Mercedes-AMG Petronas F1 Team Edition launched in India)

Mi Electric Scooter चे स्पेसिफिकेशन्स 

शाओमीच्या या इलेक्ट्रॉनिक स्कूटरमध्ये 600W इलेक्ट्रिक मोटर देण्यात आली आहे. ही मोटर अनोख्या डिजाइन असलेल्या एव्हिएशन अ‍ॅल्युमिनियम अलॉय फ्रेम बॉडीमध्ये बसवण्यात आली आहे. या ई-स्कूटरमध्ये ड्यूल ब्रेक सेटअप मिळतो. तसेच फ्रंटला E-ABS ब्रेक आणि मागे डिस्क ब्रेक देण्यात आला आहे. या ई-स्कूटरमधील डिस्प्ले आणि कनेक्टेड अ‍ॅपमध्ये स्पीड, ड्राइव्ह मोड, पावर लॉक स्टेटस आणि इतर माहिती दिसेल.  

शाओमीच्या या ई-स्कूटरमध्ये वॉक, ड्राइव्ह आणि स्पोर्ट असे तीन मोड मिळतात. हे मोड्स स्कुटरचा स्पीड कंट्रोल करतात. या ई-स्कूटरचा मॅक्सिमम स्पीड ताशी 25 किलोमीटर आहे. फुल चार्ज केल्यावर ही स्कूटर 45 किलोमीटर पर्यंत चालू शकते. विशेष म्हणजे शाओमीची ही ई-स्कूटर काही सेकंदात फोल्ड करून ठेवता येते. या स्कुटरचे वजन 14.2 किलोग्रॅम आहे आणि ही 100 किलोग्राम पर्यंतचे वजन वाहून नेऊ शकते.  

Web Title: Xiaomi introduced the special edition mi electric scooter in india 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.