काय सांगता! या पावर बँकने करता येणार लॅपटॉप चार्ज; जाणून घ्या Mi HyperSonic पावर बँकची किंमत
By सिद्धेश जाधव | Published: July 31, 2021 11:49 AM2021-07-31T11:49:45+5:302021-07-31T11:51:31+5:30
Mi HyperSonic Power Bank Price: शाओमीने भारतात Mi HyperSonic Power Bank लाँच केली आहे. ही पावर बँक 20,000mAh क्षमता, 50W फास्ट मोबाईल चार्जिंग सपोर्ट आणि 45W फास्ट लॅपटॉप चार्जिंग सपोर्टसह सादर करण्यात आली आहे.
Xiaomi कंपनी आपल्या स्वस्त स्मार्टफोन्ससाठी ओळखली जाते. परंतु याव्यतिरिक्त कंपनी अनेक भन्नाट आणि उपयुक्त प्रोडक्टस लाँच करत असते. आता कंपनीने भारतात Mi HyperSonic Power Bank लाँच केली आहे. Xiaomi च्या या नवीन पावर बॅंकमध्ये 50W फास्ट चार्जिंगला सपोर्ट आणि तीन-पोर्ट डिजाइन देण्यात आली. या पावर बँकची क्षमता 20,000mAh इतकी आहे. ही 45W चार्जींग स्पीडने लॅपटॉप देखील चार्ज करू शकते.
शाओमीच्या एमआय इंडिया वेबस्टोरवर Mi HyperSonic Power Bank क्राउडफंडिंग कँपेन अंतगर्त 3,499 रुपयांमध्ये लाँच करण्यात आली आहे. क्राउडफंडिंग कॅम्पेन संपल्यावर या पावर बँकची किंमत 1,500 रुपयांनी वाढून 4,999 रुपये केली जाईल. फक्त एकमेव मॅट ब्लॅक रंगात उपलब्ध असलेली मी पावर बँक 15 सप्टेंबरपासून शिप केली जाईल.
Mi HyperSonic Power Bank चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
Mi HyperSonic Power Bank मध्ये 20,000mAh कपॅसिटी वाली लिथियम पॉलीमर बॅटरी आहे. या द्वारे जास्तीत जास्त 50W चार्जिंग स्पीडने डिवाइस चार्ज करता येतात. यात दोन यूएसबी टाइप-ए पोर्ट आणि एक यूएसबी टाइप-सी पोर्ट देण्यात आले आहेत. Mi HyperSonic Power Bank मध्ये ब्लूटूथ हेडसेट, फिटनेस बँड आणि स्मार्टवॉच सारख्या डिवाइससाठी लो पावर चार्जिंग मोड देण्यात आला आहे.
Mi HyperSonic पावर बँक 45W चार्जिंग स्पीडने चार्ज करता येते आणि ही पावर बँक पूर्णपणे चार्ज होण्यासाठी 3 तास 50 मिनिटांचा वेळ लागतो. या पावर बँक द्वारे Lenovo L480 लॅपटॉप 2 तास 27 मिनिटे, Mi 11X Pro स्मार्टफोन 1 तास 5 मिनिटे आणि Mi Watch Revolve स्मार्टवॉच 2 तास 20 मिनिटांत चार्ज केले जाऊ शतकात, असा दावा कंपनीने केला आहे. Mi HyperSonic Power Bank मध्ये 16-लेयर चिप प्रोटेक्शन, टेम्परेचर रेजिस्टन्स, ओवर-वोल्टेज प्रोटेक्शन, शटडाउन प्रोटेक्शन, इलेक्ट्रोस्टॅटिक प्रोटेक्शन, शॉर्ट सर्किट प्रोटेक्शन आणि असे अनेक फीचर्ससह देण्यात आले आहेत.