8,720mAh बॅटरी, फ्लॅगशिप प्रोसेसरसह शाओमीचे दोन टॅबलेट लाँच; देणार का iPad ला टक्कर?  

By सिद्धेश जाधव | Published: August 11, 2021 12:21 PM2021-08-11T12:21:14+5:302021-08-11T12:27:22+5:30

Mi Pad 5 Tablet Series: शाओमी मी टॅब 5 सीरिज अंतर्गत कंपनीने Mi Pad 5 आणि Mi Pad 5 Pro हे दोन टॅब सादर केले आहेत.

Xiaomi launched mi pad 5 and mi pad 5 pro tablets check price and specifications  | 8,720mAh बॅटरी, फ्लॅगशिप प्रोसेसरसह शाओमीचे दोन टॅबलेट लाँच; देणार का iPad ला टक्कर?  

8,720mAh बॅटरी, फ्लॅगशिप प्रोसेसरसह शाओमीचे दोन टॅबलेट लाँच; देणार का iPad ला टक्कर?  

Next
ठळक मुद्देशाओमी मी टॅब 5 सीरिज अंतर्गत कंपनीने Mi Pad 5 आणि Mi Pad 5 Pro हे दोन टॅब सादर केले आहेत. शाओमीच्या या दोन्ही टॅबलेटमध्ये 11-इंचाची LCD स्क्रीन देण्यात आली आहे.Mi Pad 5 टॅबलेट सीरिज कंपनीने ब्लूटूथ कीबोर्ड आणि स्टायलसला सपोर्टसह सादर केली आहे.

Xiaomi ने चीनमध्ये आपला बहुप्रतीक्षित फ्लॅगशिप स्मार्टफोन Xiaomi Mi MIX 4 5G लाँच केला आहे. त्याचबरोबर कंपनीने आपली नवीन टॅबलेट सीरिज देखील लाँच केली आहे. शाओमी मी टॅब 5 सीरिज अंतर्गत कंपनीने Mi Pad 5 आणि Mi Pad 5 Pro हे दोन टॅब सादर केले आहेत. जवळपास तीन वर्षानंतर शाओमीने आपली टॅब सीरिज लाँच केली आहे. वर्क फ्रॉम होम आणि ऑनलाईन क्लासेसमुळे टँबलेट लाँच करण्याची ही योग्य वेळ आहे असे म्हणता येईल.  

Mi Pad 5, Mi Pad 5 Pro चे स्पेसिफिकेशन्स 

शाओमीच्या या दोन्ही टॅबलेटमध्ये 11-इंचाची LCD स्क्रीन देण्यात आली आहे. 2560 x 1600 पिक्सल रिजोल्यूशनसह येणारी ही स्क्रीन 500 निट्स ब्राईटनेस, 120Hz रिफ्रेश रेट, TrueTone डिस्प्ले, HDR10, आणि Dolby Vision अश्या फीचर्सना सपोर्ट करते. प्रोसेसिंगसाठी Mi Pad 5 Pro मध्ये Snapdragon 870 SoC देण्यात आली आहे, तर Mi Pad 5 टॅबलेट Snapdragon 860 चिपसेटवर चालतो. Android 11 आधारित MIUI 12.5 वर चालणारे हे दोन्ही टॅब 8GB रॅम आणि 256GB स्टोरेजला सपोर्ट करतात.  

Mi Pad 5 सीरीजच्या स्टँडर्ड आणि प्रो व्हेरिएंट (वायफाय व्हर्जन) मध्ये 13 मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा सेन्सर आणि 8 मेगागापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे. तसेच Mi Pad Pro 5 5G मध्ये कंपनीने 50 मेगापिक्सलचा रियर आणि 5 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा दिला आहे. शाओमी टॅबलेटच्या प्रो व्हेरिएंटमध्ये 8,600mAh बॅटरी 67W फास्ट चार्जिंगसह देण्यात आली आहे. तर स्टॅंडर्ड व्हेरिएंटमधील 8,720mAh ची बॅटरी 33W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.  

Mi Pad 5 टॅबलेट सीरिज कंपनीने ब्लूटूथ कीबोर्ड आणि स्टायलसला सपोर्टसह सादर केली आहे, हा स्टायलस डावीकडे चुंबकाच्या माध्यमातून चिकटतो.दोन्ही टॅबलेटमध्ये WiFi, Bluetooth 5.2 आणि USB-C पोर्ट देण्यात आला आहे. Mi Pad 5 टॅबमध्ये चार स्पिकर आणि Pro व्हेरिएंटमध्ये आठ स्पिकर देण्यात आले आहेत, हे Dolby Atmos ला सपोर्ट करतात. 

Mi Pad 5 सीरिज किंमत 

Mi Pad 5 सीरिज सध्या चीनमध्ये लाँच करण्यात आली आहे. लवकरच ही सीरिज भारतासह जगभरात सादर केली जाईल अशी अपेक्षा आहे. 

Mi Pad 5 4G 

6GB + 128 GB: RMB 1,999 (22,932 रुपये) 

6GB + 256 GB: RMB 2,299 (26,438 रुपये) 

Mi Pad 5 Pro 

6GB + 128 GB: RMB 2,499 (28,673 रुपये) 

6GB + 256 GB: RMB 2,799 (32,188 रुपये) 

Mi Pad Pro 5 5G 

8GB + 256 GB: RMB 3,499 (40,238 रुपये) 

Web Title: Xiaomi launched mi pad 5 and mi pad 5 pro tablets check price and specifications 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.