शाओमीचा जबरदस्त लॅपटॉप लाँच; 32GB रॅम आणि 1TB SSD स्टोरेजसह Mi Notebook Pro X 15 सादर 

By सिद्धेश जाधव | Published: June 30, 2021 04:51 PM2021-06-30T16:51:12+5:302021-06-30T16:51:50+5:30

Mi Notebook Pro X 15 launch: शाओमीने चीनमध्ये Mi Notebook Pro X 15 लॅपटॉप लाँच केला आहे. हा नवीन लॅपटॉप प्रीमियम कॅटेगरीमध्ये लाँच केला गेला आहे.  

Xiaomi launches mi notebook pro x laptop with 11th gen intel cpu oled display  | शाओमीचा जबरदस्त लॅपटॉप लाँच; 32GB रॅम आणि 1TB SSD स्टोरेजसह Mi Notebook Pro X 15 सादर 

शाओमीचा जबरदस्त लॅपटॉप लाँच; 32GB रॅम आणि 1TB SSD स्टोरेजसह Mi Notebook Pro X 15 सादर 

Next

शाओमीने चीनमध्ये Mi Notebook Pro X 15 लॅपटॉप लाँच केला आहे. या लॅपटॉपमध्ये कंपनीने ओलेड डिस्प्ले, युनिबॉडी अ‍ॅल्युमिनियम डिजाइन आणि 11th जनरेशन इंटेल कोर प्रोसेसर दिला आहे. या नवीन मी नोटबुक प्रो मॉडेलमध्ये Nvidia GeForce RTX 3050 Ti ग्राफिक्स आहे. फास्ट चार्जिंगला सपोर्ट करणाऱ्या या लॅपटॉपमधील बिल्ट-इन बॅटरी 25 मिनिटांत 0 ते 50 टक्के चार्ज होते.  

Mi Notebook Pro X 15 चे स्पेसिफिकेशन्स  

Mi Notebook Pro X 15 मध्ये 15.6 इंचाचा 3.5K (3,456x2,160 पिक्सल रिजोल्यूशन) ओलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. या लॅपटॉप 11th-generation Intel Core i7 प्रोसेसर देण्यात आला आहे. सोबत Nvidia GeForce RTX 3050 Ti ग्राफिक्स आहे. Mi Notebook Pro X 15 मध्ये 32 जीबी LPDDR4x रॅम आणि 1 टीबी PCIe  स्टोरेज देण्यात आली आहे. हा लॅपटॉप Windows 10 Home एडिशनवर चालतो. 

Xiaomi च्या या लॅपटॉपमध्ये फुल-साइज, बॅकलिट कीबोर्ड आहे. यात वाय-फाय 6, ब्लूटूथ 5.2, यूएसबी टाइप-सी पोर्ट, दोन यूएसबी-ए, चार थंडरबॉल्ट, एक HDMI 2.1 आणि 3.5mm हेडफोन जॅक देण्यात आला आहे. Mi Notebook Pro X 15 मध्ये चार स्पिकर युनिट्स मिळतात जे DTS ऑडियोला सपोर्ट करतात. सोबत 2x2 माइक्रोफोन अरे आणि व्हिडीओ कॉन्फ्रेंसिंगसाठी बिल्ट-इन 720पी वेबकॅम मिळतो. 

Xiaomi च्या या लॅपटॉपमध्ये 80Whr ची बॅटरी मिळते. ही बॅटरी 11.5 तासांचा व्हिडीओ प्लेबॅक देऊ शकते. लॅपटॉपसोबत मिळणारा 130W यूएसबी टाइप-सी पावर अडॅप्टर 25 मिनिटांत 50 टक्के बॅटरी चार्ज करू शकतो.  

Mi Notebook Pro X 15 ची किंमत  

Mi Notebook Pro X 15 च्या 11th generation Intel Core i5-11300H processor व्हेरिएंटमध्ये 16 जीबी रॅम व 512 जीबी SSD स्टोरेज देण्यात आली आहे, याची किंमत CNY 7,999 (जवळपास 92,100 रुपये) पासून सुरु होते. Intel Core i7-11370H processor सह येणाऱ्या या लॅपटॉपच्या व्हेरिएंटमध्ये 32 जीबी रॅम आणि 1 टीबी SSD स्टोरेज मिळते, ज्याची किंमत CNY 9,999 (जवळपास 1,15,100 रुपये) आहे.  

हे दोन्ही मॉडेल सध्या चीनमध्ये प्री-बुकिंगसाठी उपलब्ध आहेत. 9 जुलैपासून यांची शिपमेंट सुरु होईल. Mi Notebook Pro X 15 भारतासह जगभरात कधी उपलब्ध होतील याची माहिती मात्र कंपनीने दिलेली नाही.  

Web Title: Xiaomi launches mi notebook pro x laptop with 11th gen intel cpu oled display 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.