PUBG ला टक्कर देण्यासाठी शाओमीने आणला 'नवा गेम'
By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2019 11:54 AM2019-01-21T11:54:02+5:302019-01-21T12:07:08+5:30
पोकेमॉन गो, ब्लू व्हेल, मोमो चॅलेंजनंतर PUBG या गेमने अनेकांना वेड लावलं आहे. मात्र 'PUBG'ला टक्कर देण्यासाठी शाओमीने आता एक नवा गेम आणला आहे. Survival असं या गेमचं नाव असून एमआयच्या स्टोरवर हा गेम उपलब्ध आहे.
नवी दिल्ली - सोशल मीडियासोबतच तरुणाईमध्ये सध्या ऑनलाईन गेमचीही क्रेझ आहे. पोकेमॉन गो, ब्लू व्हेल, मोमो चॅलेंजनंतर PUBG या गेमने अनेकांना वेड लावलं आहे. मात्र 'PUBG'ला टक्कर देण्यासाठी शाओमीने आता एक नवा गेम आणला आहे. Survival असं या गेमचं नाव असून एमआयच्या स्टोरवर हा गेम उपलब्ध आहे. शाओमीचा 'Survival Game' 185 एमबीचा आहे.
'Survival Game' हा PUBG सारखाच एक नवा गेम आहे. गेम एका युद्धाच्या मैदानावर आधारीत असून जिवंत राहण्यासाठी अन्य प्लेअर्सला मारणे यामध्ये गरजेचे आहे. भारतीयांसाठी खास हा गेम बनवण्यात आल्याचे शाओमी कंपनीने म्हटले आहे. या गेमची सुरुवात पॅराशूटहून उडी मारण्यापासून होते आणि शेवटपर्यंत गेममध्ये जिवंत राहणाऱ्या प्लेअरला विजेता घोषित करण्यात येते. Survival या गेममध्ये PUBG प्रमाणेच अनेक गोष्टी देण्यात आल्या आहेत. मॅपपासून गनपर्यंतचे सगळे फीचर्स हे सारखेच आहेत. अनेक युजर्सना शाओमीचा हा गेम आवडला आहे. तर अनेकांनी PUBG चं बेस्ट गेम असल्याचं म्हटलं आहे.