शाओमीने लहान मुलांसाठी आणले स्मार्टवॉच; दोन कॅमेरे बनणार पालकांचे डोळे
By ऑनलाइन लोकमत | Published: January 7, 2020 03:29 PM2020-01-07T15:29:53+5:302020-01-07T15:30:28+5:30
आज मुलांचे आई-वडील दोघेही नोकरीला जातात. तसेच मुलांना शाळेमध्ये, खेळण्यासाठी सोडले जाते. या काळात त्यांच्याशी पालकांचा काहीच संपर्क राहत नाही. अशावेळी मुलांचे लैंगिक शोषण, अपहरण, खून आदी प्रकार घडल्याचे आपण नेहमीच पाहतो.
नवी दिल्ली : शाओमी (Xiaomi) ने लहान मुलांसाठी खास घड्याळ लाँच केले आहे. या स्मार्टवॉचचे नाव Mitu चिल्ड्रेन लर्निंग वॉच 4 प्रो आहे. शाओमीच्या या घडाळ्याच्या पुढील बाजुला दोन कॅमेरे देण्यात आले आहेत. पहिला 5 मेगापिक्सलचा वाईड अँगल कॅमेरा आणि 8 मेगापिक्सलचा झूम कॅमेरा देण्यात आला आहे. हा कॅमेरा मुलांच्या हालचाली, आजुबाजुची परिस्थिती पालकांना दाखविणार आहे.
आज मुलांचे आई-वडील दोघेही नोकरीला जातात. तसेच मुलांना शाळेमध्ये, खेळण्यासाठी सोडले जाते. या काळात त्यांच्याशी पालकांचा काहीच संपर्क राहत नाही. अशावेळी मुलांचे लैंगिक शोषण, अपहरण, खून आदी प्रकार घडल्याचे आपण नेहमीच पाहतो. यामुळे पालकांना चिंतामुक्त करण्यासाठी शाओमीने हे स्मार्टवॉच आणलेले आहे. हे घड्याळ 10 पटींनी अधिक AI पोझिशनिंगचा वापर करते. आणि यामध्ये L1+L5 ड्युअल फ्रीक्वेन्सी GPS कॉर्डिनेटेड पोझिशनिंग सिस्टम देण्यात आली आहे.
हे स्मार्टवॉच क्वालकॉम स्नॅपड्रॅगन Wear 2500 प्रोसेसर ने युक्त आहे. यामध्ये 1 जीबीची रॅम आणि 8 जीबीची इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. महत्वाचे म्हणजे हे वॉच तुम्ही तुम्हाला हवे तसे कस्टमाईज करू शकता. मुलांना हे घड्याळ वापरणे सोपे जाण्यासाठी ही सोय देण्यात आली आहे.
शाओमीची गॅजेटस् वापरताय? खरी आहेत की बनावट? असे तपासा
यामध्ये यूजर हाय क्वालिटी लर्निंग अॅप वापरू शकतात. यामध्ये इंग्लिश, मॅथ्स, सोशल, फन, लॉजिकल थिंकिंग सारखे विषय आहेत. याशिवाय हे वॉच इंटरअॅक्टीव्ह इंग्लिश लर्निंग टूलला सपोर्ट करते. शाओमीची स्मार्टवॉचला 1.78 इंचाचा डिस्प्ले देण्यात आले आहे. तसेच 4G LTE आणि NFC कनेक्टिविटी देण्यात आली आहे. सध्या हे घड्याळ चीनमध्ये लाँच करण्यात आले आहे. या घडाळयाची किंमत 13,450 रुपये आहे.