चार्जिंगचं नो टेन्शन! आता उन्हात चार्ज होणार फोन; 'या' कंपनीने आणली दमदार पॉवर बँक
By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2020 12:45 PM2020-05-29T12:45:42+5:302020-05-29T12:58:00+5:30
कोणत्याही बॅगपॅकला अटॅच केल्यानंतर चालताना किंवा सायकलिंग करतानाही सहज चार्ज करता येणार आहे.
नवी दिल्ली - स्मार्टफोनचा वापर हा हल्ली मोठ्या प्रमाणात केला जातो. साहजिकच त्यामुळे फोनचं चार्जिंग लवकर संपतं. नेमका गरजेच्या वेळेला फोन बंद पडतो आणि अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. पण आता चार्जिंगचं टेन्शन घेण्याची गरज नाही. कारण शाओमीने एक दमदार सोलर पॉवर बँक आणली आहे. Youpin प्लॅटफॉर्मवर कंपनीने नवीन सोलर पॉवर बँक लाँच केले आहे. या YEUX पॉवर बँकला आऊटडोर ट्रॅव्हलसाठी डिझाईन करण्यात आले आहे.
सोलर पॉवर बँकला बॅगपॅक अटॅच केले जाऊ शकते. तसेच सायकलिंग, हायकिंग किंवा कॅम्पिंग करताना याची खूप मोठी मदत होणार आहे. 349 युआन (जवळपास 3,600 रुपये) या पॉवर बँकची किंमत आहे. YEUX सोलर मोबाईल पॉवर बँक हाय सेन्सिटिविटी, सिंगल क्रिस्टल सिलिकॉन सोलर पॅनेलचा वापर करते. जुन्या सोलर पॅनेल्सच्या तुलनेत याचा कन्वर्जन रेट खूप चांगला आहे. पाऊस पडल्यानंतरही चार्ज होणार. जर कोणत्याही बॅगपॅकला अटॅच केल्यानंतर चालताना किंवा सायकलिंग करतानाही सहज चार्ज करता येणार आहे.
पॉवर बँकमध्ये देण्यात आलेल्या चार्जिंग बोर्डचे वैशिष्ट्ये म्हणजे यात सोलर चिप टेक्नोलॉजी देण्यात आली आहे. याच्या मदतीने कमी ऊन असले तरी तो वेगाने चार्ज करता येऊ शकतो. यात ग्रीन लाईट म्हणजे खूप ऊन, यलो लाईट म्हणजे साधारणपणे आणि रेड लाईट म्हणजे कमी ऊन दर्शवते. सोलर चार्जरमध्ये 6400 एमएएचची लिथियम पॉलिमर बॅटरी देण्यात आली आहे. सोलर चार्जर या बॅटरीला कोणत्याही लाईटला रिचार्जवर ठेऊ शकता येते. पॉवर सप्लाय झाल्यानंतर बॅटरी थेट रिचार्ज करता येऊ शकते. ही थ्री आऊट इंटरफेस डिझाईनवर काम करते.
पॉवर बँकेत दोन यूएसबी - ए इंटरफेस 5V/3A चे मॅक्झिमम आऊटपूट सोबत देण्यात आले आहे. एक टाईप सी इंटरफेस 5V/3A आऊटपूट सोबत देण्यात आले आहेत. याच्या मदतीने फोन, टॅबलेट्स, डिजिटल कॅमेरा, किंवा दुसरा पॉवर बँक आणि डिव्हाईस चार्ज करता येऊ शकतो. तसेच मायक्रो यूएसबी इनपूट इंटरफेस देण्यात आला आहे. जे जास्तीत जास्त 5V/2A इनपूट सपोर्ट करते. या पॉवर बँकेला इनक्रिप्टेड ऑक्सफर्ड क्लोथच्या मदतीने तयार केले आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
CoronaVirus News : बापरे! लस तयार झाली तरी कोरोना पाठ सोडणार नाही; तज्ज्ञांचा दावा
CoronaVirus News : कोरोनाच्या लढ्यात नवा प्रयोग; 'या' शहरात सुरू झाले 'धन्वंतरी रथ'
CoronaVirus News : कोरोनाच्या लढ्यात आशेचा किरण! देशात 'या' 9 औषधांची केली जातेय चाचणी
CoronaVirus News : लॉकडाऊनमुळे नोकरी गेली; आईला सांभाळण्यासाठी पैसे नसल्याने मुलाचं भयंकर कृत्य