Xiaomi ने लाँच केले दोन धमाकेदार स्मार्टटीव्ही; जाणून घ्या ड्युअल कॅमेरा असलेल्या टीव्हीची किंमत 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2021 12:14 PM2021-06-29T12:14:00+5:302021-06-29T12:22:20+5:30

Mi TV 6 launch: Mi TV 6 Extreme Edition मध्ये मीडियाटेक MT9950 चिपसेटसह 4K QLED स्क्रीन देण्यात आली आहे.  

Xiaomi launches two explosive smart TVs; Find out the price of a TV with a dual camera | Xiaomi ने लाँच केले दोन धमाकेदार स्मार्टटीव्ही; जाणून घ्या ड्युअल कॅमेरा असलेल्या टीव्हीची किंमत 

Xiaomi ने लाँच केले दोन धमाकेदार स्मार्टटीव्ही; जाणून घ्या ड्युअल कॅमेरा असलेल्या टीव्हीची किंमत 

Next

Mi tv 6 extreme edition mi tv es 2022 multi zone backlight system launched price specifications 

Xiaomi ने आपला स्मार्टटीव्हीचा पोर्टफोलिओ वाढवला आहे. कंपनीने Mi TV 6 Extreme Edition आणि Mi TV ES 2022 स्मार्ट टीव्ही चीनमध्ये लाँच केले आहेत. यातील Mi TV 6 Extreme Edition मध्ये हायएंड स्पेसिफिकेशन्स देण्यात आले आहेत. या टीव्हीमध्ये MediaTek MT9950 चिपसेट, 3D LUT फिल्म इंडस्ट्रियल ग्रेड कलर करेक्शन टेक्नॉलॉजी आणि ड्युअल कॅमेरा असे स्पेक्स देण्यात आले आहेत. तर Mi TV ES 2022 मध्ये MediaTek MT9638 चिपसेट आणि 12.5W चे 4 यूनिट स्पिकर सिस्टमसह ड्युअल चॅनेल असे फीचर्स आहेत.  

Mi TV 6 Extreme Edition आणि Mi TV ES 2022 ची किंमत  

Mi TV 6 Extreme Edition  

  • 55 इंचाचा मॉडेल CNY 5,999 (अंदाजे 69,000 रुपये)  
  • 65 इंचाचा मॉडेल CNY 7,999 (अंदाजे 92,000 रुपये)  
  • 75 इंचाचा मॉडेल CNY 9,999 (अंदाजे 1,15,000 रुपये)  

Mi TV ES 2022  

  • 55 इंचाचा मॉडेल CNY 3,399 (अंदाजे 39,100 रुपये)  
  • 65 इंचाचा मॉडेल CNY 4,399 (अंदाजे 50,600 रुपये)  
  • 75 इंचाचा मॉडेल CNY 5,999 (अंदाजे 69,000 रुपये) 

हे दोन्ही टीव्ही 9 जुलैपासून सेलसाठी उपलब्ध होतील, तसेच यांची प्री-ऑर्डर Mi.com वर सुरु झाली आहे.  

Mi TV 6 Extreme Edition चे स्पेसिफिकेशन्स  

Mi TV 6 Extreme Edition मध्ये 1,200 निट्स ब्राईटनेस आणि 120Hz रिफ्रेश रेटसह 4K QLED डिस्प्ले देण्यात आला आहे. या टीव्हीमध्ये मीडियाटेक MT9950 चिपसेटसह 4.5 जीबी रॅम आणि 64जीबी स्टोरेज देण्यात आली आहे. या टीव्हीची खासियत यात देण्यात आलेला ड्युअल एआय कॅमेरा ज्यात 48 मेगापिक्सलचा मुख्य सेन्सर आहे. या टीव्हीमध्ये 100W ची ऑडियो सिस्टम देण्यात आली आहे. त्याचबरोबर 97 टक्के DCI-P3 कलर गेमट कवरेज, 10.7 बिलियन कलर्स, 3D LUT फिल्म इंडस्ट्रियल ग्रेड कलर करेक्शन टेक्नॉलॉजी आणि IMAX एन्हान्सड व्हिडीओ असे फीचर्स देखील मिळतात.  

Mi TV ES 2022 चे स्पेसिफिकेशन्स  

Mi TV ES 2022 मध्ये MediaTek MT9638 चिपसेट देण्यात आला आहे. या चिपसेटला 2GB रॅम आणि 32GB स्टोरेजची जोड देण्यात आली आहे. या टीव्हीमध्ये XiaoAI व्हॉईस असिस्टंट मिळतो. तसेच ही टीव्ही HDR 10+, 94 टक्के DCI-P3 कलर गेमट आणि MEMC टेक्नॉलॉजीला सपोर्ट करते. या टीव्हीमध्ये स्टिरियो प्लेबॅकसह 12.5W चे चार यूनिट स्पिकर सिस्टम देण्यात आली आहे.  

Web Title: Xiaomi launches two explosive smart TVs; Find out the price of a TV with a dual camera

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.