Xiaomi चा शानदार स्मार्टफोन झाला लाँच; स्नॅपड्रॅगन 732G, 8GB रॅमसह भारतात आला Mi 11 Lite
By सिद्धेश जाधव | Published: June 22, 2021 01:09 PM2021-06-22T13:09:44+5:302021-06-22T13:10:30+5:30
Xiaomi Mi 11 Lite India launch: Xiaomi Mi 11 Lite स्मार्टफोनमध्ये Snapdragon 732G चिपसेट, 33W 4,250mAh बॅटरी आणि 64MP रियर कॅमेरा असे फीचर्स देण्यात आले आहेत.
Xiaomi ने आज भारतात आपला नवीन स्मार्टफोन Mi 11 Lite लाँच केला आहे. शाओमी मी 11 लाइट 2021 मधील सर्वात स्लीक आणि लाइट स्मार्टफोन आहे, असा दावा शाओमीने केला आहे. मिड बजेट सेगमेंटमध्ये असलेल्या या स्मार्टफोनमध्ये Snapdragon 732G चिपसेट, 33W 4,250mAh बॅटरी आणि 64MP रियर कॅमेरा असे फीचर्स आहेत.
Xiaomi Mi 11 Lite चे स्पेसिफिकेशन्स
Mi 11 Lite मध्ये बेजल लेस पंच-होल डिस्प्ले देण्यात आला आहे. 6.55 इंचाचा हा फुलएचडी+ अॅमोलेड डिस्प्ले 20:9 अस्पेक्ट रेशियो आणि 2400 x 1080 पिक्सल रिजोल्यूशनसह येतो. या डिस्प्लेमध्ये 90हर्ट्ज रिफ्रेश रेट तसेच 240हर्ट्ज टच सॅम्पलिंग रेट देण्यात आला आहे. तसेच याला कोर्निंग गोरिल्ला ग्लास 5 ची सुरक्षा देण्यात आली आहे.
अँड्रॉइड 11 ओएसवर लाँच करण्यात आलेला Mi 11 Lite मीयुआय 12 सह चालतो. या फोनमध्ये Qualcomm® Snapdragon 732G चिपसेट आणि एड्रेनो 618 जीपीयूला देण्यात आला आहे. शाओमीचा हा फोन 6GB+128GB आणि 8GB+128GB अश्या दोन व्हेरिएंट्समध्ये लाँच झाला आहे.
Xiaomi Mi 11 Lite मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळतो. फोनच्या मागे एलईडी फ्लॅशसह 64 मेगापिक्सलचा प्राइमरी सेन्सर देण्यात आला आहे, त्याचबरोबर 8 मेगापिक्सलची अल्ट्रा वाईड अँगल लेन्स आणि 5 मेगापिक्सलची टेलीफोटो लेन्स मिळते. मी 11 लाइट 16 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.
मी 11 लाइट मध्ये शाओमीने 4,250mAh ची बॅटरी दिली आहे. हि बॅटरी 33W फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीने चार्ज करता येते. हा फोन फक्त 30 मिनिटांत 0 वरून 59 टक्के चार्ज होऊ शकतो. विशेष म्हणजे 33W Fast charger फोनसोबत बॉक्समध्ये देण्यात आला आहे.
Xiaomi Mi 11 Lite ची किंमत
Xiaomi Mi 11 Lite भारतात दोन व्हेरिएंट्समध्ये लाँच करण्यात आला आहे. फोनच्या छोट्या व्हेरिएंटमध्ये 6 जीबी रॅम आणि 128 जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे, या मॉडेलची किंमत 21,999 रुपये आहे. तसेच, 8 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज असलेला व्हेरिएंट 23,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. मी 11 लाइट 28 जूनपासून mi.com, Mi Home, फ्लिपकार्ट आणि रिटेलस स्टोर्सवरून विकत घेता येईल. तुम्ही हा 25 जूनपासून प्री-ऑर्डर करू शकता.