सॅमसंगनं मागितली माफी, आता शाओमी देखील हात जोडणार? स्मार्टफोन्समधील घोटाळा उघड

By सिद्धेश जाधव | Published: March 29, 2022 04:06 PM2022-03-29T16:06:48+5:302022-03-29T16:06:54+5:30

Mi 11 Series च्या स्मार्टफोन्समध्ये गीकबेंच स्कोरवर परिणाम करणर फीचर सापडलं आहे. असंच फिचर सॅमसंगच्या स्मार्टफोन्समध्ये देखील आढळलं होतं.  

Xiaomi Mi 11 Series Is Manipulating Geekbench Score Like Samsung Galaxy S Series  | सॅमसंगनं मागितली माफी, आता शाओमी देखील हात जोडणार? स्मार्टफोन्समधील घोटाळा उघड

सॅमसंगनं मागितली माफी, आता शाओमी देखील हात जोडणार? स्मार्टफोन्समधील घोटाळा उघड

googlenewsNext

Samsung च्या CEO जोंग ही हँग यांनी काही दिवसांपूर्वी ग्राहकांची जाहीर माफी मागितली होती. Galaxy S22 सीरीजचे स्मार्टफोन GOS अ‍ॅपमुळे Geekbench स्कोरमध्ये छेडछाड करत असल्याची चूक सॅमसंगच्या सीईओनी मान्य केली होती. परंतु आता अशीच चूक सॅमसंगची कट्टर प्रतिस्पर्धी Xiaomi करत असल्याचं दिसत आहे. कंपनीचे Mi 11 सीरीजचे स्मार्टफोन्स बेंचमार्किंग स्कोरवर प्रभाव टाकत आहेत.  

शाओमी स्मार्टफोन्समधील घोटाळा  

शाओमीच्या Mi 11 Series च्या स्मार्टफोन्समध्ये असं फिचर आढळलं आहे जे गिकबेंच स्कोरशी गेमिंगच्या वेळी छेडछाड करत आहेत. यात Mi 11 Pro, Mi 11 Ultra आणि Mi 11X Pro स्मार्टफोन्सचा समावेश आहे, अशी माहिती प्राइमेट लॅब्सच्या रिपोर्टमधून समोर आली आहे. हे फोन्स स्मार्टफोनवर गेमिंग सुरु केल्यावर सिंगल आणि मल्टीकोरच्या स्कोरमध्ये फरक दिसतो. 

Geekbench चे को-फाउंडर जॉन पूल यांनी देखील शाओमीच्या Mi 11 सीरिजच्या गिकबेंच स्कोरमधील छेडछाडीची माहिती दिली आहे. त्यानुसार या फोन्समध्ये परफॉर्मन्सवर प्रभाव टाकणारं अ‍ॅप आहे, जे डिवाइसची सिंगल कोर परफॉर्मन्स 30 टक्के आणि मल्टी कोर स्कोर 15 टक्क्यांनी कमी करतो. शाओमीनं मात्र यावर कोणतंही भाष्य केलं नाही.  

सॅमसंग फोन्समधील घोटाळा  

सॅमसंग आपल्या स्मार्टफोनमध्ये Games Optimization Service (GOS) चा वापर करते. ही सर्व्हिस 10,000 पेक्षा जास्त अ‍ॅप्सची परफॉर्मन्स स्लो डाउन करते आणि गेमिंग अ‍ॅप्सची परफॉर्मन्स वाढवते. तसेच अनेक गेम्स देखील या सर्व्हिसमुळे स्लो होत आहेत. त्याचबरोबर हे फोन Instagram, TikTok, Twitter, आणि 6,800 पेक्षा जास्त अ‍ॅप्स थ्रोटल करतात.  

विशेष म्हणजे GOS बेंचमार्किंग प्लॅटफॉर्म्स 3DMark, AnTuTu, PCMark, GFXBench, आणि Geekbench 5 यांच्या परफॉर्मन्सवर प्रभाव टाकत नाही. त्यामुळे सॅमसंगच्या स्मार्टफोन्सचे बेंचमार्क स्कोर चांगले येतात आणि रोजच्या वापरातील अ‍ॅप्स मात्र स्लो होतात. GOS अ‍ॅप्स ओळखून अ‍ॅक्टिव्हेट होते, असं गिकबेंचला दिसून आलं आहे. 

Samsung नं हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर दक्षिण कोरियामध्ये Galaxy S22 Series वर एक सॉफ्टवेयर अपडेट जारी केला आहे. यामुळे डिवाइसच्या CPU आणि GPU च्या रिजल्टवर GOS चा प्रभाव पडत नाही. हा अपडेट या सीरीजच्या जुना मॉडेल्ससाठी देखील रोल आउट केला जाईल.   

Web Title: Xiaomi Mi 11 Series Is Manipulating Geekbench Score Like Samsung Galaxy S Series 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.