लवकरच येणार Xiaomi चा धमाकेदार फ्लॅगशिप स्मार्टफोन; Mi 11T Pro चे स्पेसिफिकेशन्स लीक 

By सिद्धेश जाधव | Published: August 21, 2021 12:38 PM2021-08-21T12:38:26+5:302021-08-21T12:43:39+5:30

Mi 11T Pro Specifications: Mi 11T Pro स्मार्टफोन एका फ्लॅगशिप प्रोसेसर, 120Hz रिफ्रेश रेट डिस्प्ले आणि 64MP कॅमेऱ्याला सपोर्ट करेल.  

Xiaomi mi 11t pro specifications leaked online   | लवकरच येणार Xiaomi चा धमाकेदार फ्लॅगशिप स्मार्टफोन; Mi 11T Pro चे स्पेसिफिकेशन्स लीक 

लवकरच येणार Xiaomi चा धमाकेदार फ्लॅगशिप स्मार्टफोन; Mi 11T Pro चे स्पेसिफिकेशन्स लीक 

Next
ठळक मुद्देMi 11T Pro मध्ये Mi 11 Lite सारखा कॅमेरा सेटअप मिळेलMi 11T Pro स्मार्टफोन प्लास्टिक बॅक पॅनल आणि मेटल फ्रेमसह सादर केला जाईल.या फोनमधील 5,000mAh ची बॅटरी आणि 120W फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीसह देण्यात येईल.

Xiaomi आपल्या आगामी Mi 11T आणि Mi 11T Pro स्मार्टफोन्सवर काम करत आहे. यातील Mi 11T स्मार्टफोनची माहिती काही दिवसांपूर्वी समोर आली होती. आता व्हिएतनामच्या एका युट्युब चॅनेलवर Mi 11T Pro संबंधित एक व्हिडीओ शेयर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये या स्मार्टफोनच्या संभावित स्पेसिफिकेशन्सची माहिती दिली आहे. हा स्मार्टफोन एका फ्लॅगशिप प्रोसेसर, 120Hz रिफ्रेश रेट डिस्प्ले आणि 64MP कॅमेऱ्याला सपोर्ट करेल.  

Mi 11T Pro चे संभाव्य स्पेसिफिकेशन्स 

Mi 11T Pro स्मार्टफोन प्लास्टिक बॅक पॅनल आणि मेटल फ्रेमसह सादर केला जाईल. यात पंच-होल कटआउटसह 120Hz रिफ्रेश रेट असलेला AMOLED डिस्प्ले देण्यात येईल. या स्मार्टफोनमधील प्रोसेसरची ठोस माहिती समोर आली नाही. यात स्नॅपड्रॅगॉनचा 888 किंवा 888+ प्रोसेसर असू शकतो. हा फोन Android 11 आधारित MIUI 12.5 वर चालेल.  हे देखील वाचा: शक्तिशाली स्नॅपड्रॅगन 898 प्रोसेसरसह सादर होणार Samsung Galaxy Tab S8 सीरीज; लाँच होऊ शकतात तीन टॅबलेट

युट्युब व्हिडीओमध्ये Mi 11T Pro मध्ये Mi 11 Lite सारखा कॅमेरा सेटअप मिळेल, असे सांगण्यात आले आहे. म्हणजे या फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळेल. ज्यात 64 मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा, 8 मेगापिक्सलचा अल्ट्रा वाईड कॅमेरा आणि 5 मेगापिक्सलचा मॅक्रो सेन्सर मिळू शकतो. तसेच या फोनमध्ये 16 मेगापिक्सलचा सेल्फी शुटर मिळेल. या फोनमधील 5,000mAh ची बॅटरी आणि 120W फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीसह देण्यात येईल.  हे देखील वाचा: WhatsApp च्या या फिचरमुळे आपोआप वाचणार तुमच्या स्मार्टफोनची स्टोरेज; जाणून घ्या कसे वापरायचे हे फिचर

Xiaomi Mi 11T चे संभाव्य स्पेसिफिकेशन्स  

Xiaomi Mi 11T स्मार्टफोनचे कोडनेम Amber आहे. हा फोन 20:9 अस्पेक्ट रेशयो आणि 120Hz रिफ्रेश रेट असलेल्या डिस्प्लेसह सादर केला जाईल. या फोनमध्ये मीडियाटेकचा चिपसेट असू शकतो. तसेच या फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळू शकतो. ज्यात 64-मेगापिक्सल OmniVision OV64B चा मुख्य कॅमेरा, Sony IMX355 वाईड लेन्स आणि 3x झूम सपोर्टसह टेलीफोटो कॅमेरा देण्यात येईल. 

Web Title: Xiaomi mi 11t pro specifications leaked online  

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.