200MP कॅमेरा असलेल्या शाओमी फोनच्या प्रोसेसरचा खुलासा; मिळणार अॅडव्हान्स रॅमची जोड
By सिद्धेश जाधव | Published: August 3, 2021 11:37 AM2021-08-03T11:37:50+5:302021-08-03T11:39:54+5:30
Xiaomi MI 12 Features: Xiaomi Mi 12 मध्ये स्नॅपड्रॅगन 898 प्रोसेसर दिला जाऊ शकतो. मी 12 मध्ये लेटेस्ट LPDDR5X रॅम दिला जाईल.
शाओमी सतत नवनवीन फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स आपल्या स्मार्टफोन्समध्ये जोडत असते. काही फीचर्स इतर स्मार्टफोन कंपन्यांच्या आधी सर्वप्रथम शाओमी फोन्समध्ये दिसतात. सध्या अशाच एका आगामी फिचरची चर्चा सुरु आहे. शाओमी आपल्या आगामी मी 12 सीरीजच्या Mi 12 स्मार्टफोनमध्ये 200MP चा कॅमेरा देणार आहे, अशा बातम्या गेले काही दिवस येत आहेत. आता या स्मार्टफोनच्या प्रोसेसरची माहिती मिळाली आहे.
शाओमी मी 12 यावर्षीच्या शेवटी किंवा 2022 च्या सुरुवातीला लाँच केला जाऊ शकतो. आता आलेल्या लीक रिपोर्टनुसार Xiaomi Mi 12 मध्ये स्नॅपड्रॅगन 898 प्रोसेसर दिला जाऊ शकतो. गेले काही वर्ष शाओमी क्वालकॉमसह मिळून फ्लॅगशिप प्रोसेसर सर्वप्रथम सादर करण्याचे काम करत आहे. त्यामुळे मी 12 मध्ये क्वालकॉमचा आगामी नवीन फ्लॅगशिप प्रोसेसर दिला जाऊ शकतो.
अजून एका लीकमध्ये सांगण्यात आले आहे कि मी 12 मध्ये लेटेस्ट LPDDR5X रॅम दिला जाईल. विशेष म्हणजे सध्या बाजारात उपलब्ध असलेले फ्लॅगशिप स्मार्टफोन प्रोसेसर या रॅम टेक्नॉलॉजीला सपोर्ट करत नाहीत. परंतु आगामी स्नॅपड्रॅगन 898 प्रोसेसर LPDDR5X ला सपोर्ट करू शकतो. याआधी Xiaomi Mi 12 मध्ये 200 मेगापिक्सलचा रियर कॅमेरा असेल, अशी माहिती आली होती. या स्मार्टफोनमध्ये सॅमसंग आणि ऑलिंपसने बनवलेला 200MP ISOCELL कॅमेरा सेन्सर मिळू शकतो.