एक नंबर! ‘ही’ कंपनी आणू शकते 200MP कॅमेरा आणि स्नॅपड्रॅगन 895 चिपसेट असलेला स्मार्टफोन 

By सिद्धेश जाधव | Published: June 29, 2021 04:43 PM2021-06-29T16:43:52+5:302021-06-29T16:46:01+5:30

Xiaomi Mi 12 Leak: Xiaomi Mi 12 स्मार्टफोनमध्ये सर्वात शक्तिशाली Qualcomm Snapdragon 895 चिपसेट आणि Samsung व Olympus ने बनवलेला 200MP ISOCELL कॅमेरा सेन्सर देण्यात येईल.  

Xiaomi Mi 12 Qualcomm Snapdragon 895 200MP ISOCELL camera sensor Samsung Olympus  | एक नंबर! ‘ही’ कंपनी आणू शकते 200MP कॅमेरा आणि स्नॅपड्रॅगन 895 चिपसेट असलेला स्मार्टफोन 

हा प्रतीकात्मक फोटो आहे.

Next

कॅमेरा हा स्मार्टफोनमधील एक निर्णायक घटक आहे. नवीन स्मार्टफोन विकत घेताना कॅमेऱ्याचा विचार केला जातो. त्यामुळेच स्मार्टफोन कंपन्या कॅमेरा टेक्नॉलॉजीमध्ये नवनवीन अपडेट घेऊन येतात. सध्या कॅमेऱ्यातील मेगापिक्सल वाढवण्याची शर्यत सुरु आहे. 48MP, 64MP आणि 108MP चे कॅमेरा सादर करून झाल्यानंतर आता बातमी येत आहे कि Xiaomi कंपनी 200MP camera sensor असलेल्या स्मार्टफोनवर काम करत आहे. हा स्मार्टफोन Mi 12 नावाने लाँच केला जाईल आणि यात Snapdragon 895 चिपसेट देण्यात येईल.  

प्रसिद्ध टिपस्टर डिजिटल चॅट स्टेशनने Xiaomi Mi 12 स्मार्टफोनसंबंधित बातमी दिली आहे. त्याने मायक्रोब्लॉगिंग साईट विबोवरून महत्वाची माहिती दिली आहे. शाओमी कंपनी आपल्या ‘मी’ सीरीजच्या नवीन स्मार्टफोनवर काम करत आहे, हा स्मार्टफोन Mi 12 नावाने बाजारात लाँच केला जाईल, असा दावा या लीकमध्ये करण्यात आला आहे. या स्मार्टफोनमध्ये 200MP ISOCELL camera sensor चा वापर करण्यात येईल. या सेन्सरची निर्मिती Samsung आणि Olympus या दोन कंपन्या मिळून करत आहेत.

 

या स्मार्टफोनचा फक्त कॅमेरा डिपार्टमेंट शक्तिशाली नसेल तर या फोनमध्ये क्वॉलकॉमचा सर्वात पावरफुल चिपसेट असल्याचे देखील माहिती देण्यात आली आहे. हा शाओमी फोन Qualcomm Snapdragon 8450 चिपसेटसह बाजारात दाखल होईल, अशी माहिती लीकमधून समोर आली आहे. क्वॉलकॉमचा हा आगामी चिपसेट Snapdragon 895 नावाने सादर केला जाऊ शकतो. ही माहिती अजूनतरी फक्त लीक म्हणून समोर आली आहे. जोपर्यंत हा फोन प्रत्यक्षात बाजारात येत नाही तोपर्यंत इतर स्पेक्स सांगता येणार नाहीत.  

Web Title: Xiaomi Mi 12 Qualcomm Snapdragon 895 200MP ISOCELL camera sensor Samsung Olympus 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.