शाओमी मी ५ एक्सची घोषणा
By शेखर पाटील | Published: July 28, 2017 08:12 PM2017-07-28T20:12:22+5:302017-07-28T20:13:17+5:30
शाओमी कंपनीने ड्युअल रिअर कॅमेर्यांनी सज्ज असणारा मी ५ एक्स हा स्मार्टफोन जाहीर केला असून यात अनेक उत्तमोत्तम फिचर्सचा समावेश करण्यात आला आहे.
शाओमी कंपनीने ड्युअल रिअर कॅमेर्यांनी सज्ज असणारा मी ५ एक्स हा स्मार्टफोन जाहीर केला असून यात अनेक उत्तमोत्तम फिचर्सचा समावेश करण्यात आला आहे.
शाओमी मी ५ एक्स या मॉडेलची खासियत म्हणजे हा मीयुआय ९ या ऑपरेटींग प्रणालीवर चालणारा पहिला स्मार्टफोन आहे. यात क्वॉलकॉमचा ऑक्टा-कोअर स्नॅपड्रॅगन ६२५ प्रोसेसर प्रदान करण्यात आला आहे. याची रॅम चार जीबी आणि इनबिल्ट स्टोअरेज ६४ जीबी इतके असून ते मायक्रो-एसडी कार्डच्या मदतीने १२८ जीबीपर्यंत वाढविता येणार आहे. शाओमी मी ५ एक्स या मॉडेलमध्ये पाच इंच आकारमानाचा आणि फुल एचडी म्हणजेच १०८० बाय १९२० पिक्सल्स क्षमतेचा डिस्प्ले असेल.
शाओमी मी ५ एक्स या स्मार्टफोनच्या मागील बाजूस दोन कॅमेरे देण्यात आले आहेत. यातील पहिला कॅमेरा हा एफ/२.२ अपार्चर व १.२५ मायक्रॉन पिक्सलसह १२ मेगापिक्सल्सचा असेल. तर दुसरा एफ/२.६ अपार्चर, १.२५ मायक्रॉन पिक्सलसह १२ मेगापिक्सल्सचा टेलिफोटो कॅमेरा असेल. तर सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी यात ५ मेगापिक्सल्सचा कॅमेरा देण्यात आला असून यात रिअल-टाईम ब्युटिफिकेशनची सुविधा प्रदान करण्यात आली आहे.
शाओमी मी ५ एक्स या मॉडेलमध्ये फोर-जी व्हिओ-एलटीई तसेच फोर-जी नेटवर्क सपोर्ट असेल. याशिवाय, यात वाय-फाय, ब्ल्यु-टुथ, जीपीएस/ए-जीपीएस, युएसबी टाईप-सी पोर्ट, हेडफोन जॅक आदी सुविधा असतील. याशिवाय यात अँबियंट लाईट, प्रॉक्झीमिटी, अॅक्सलेरोमीटर, गायरोस्कोप, मॅग्नेटोमीटर, इन्फ्रारेड आदी सेन्सर्स असतील. ब्लॅक, गोल्ड आणि पिंक या तीन आकर्षक रंगांमध्ये हे मॉडेल पहिल्यांदा चीनमध्ये उपलब्ध करण्यात आले असून याचे रूपयातील मूल्य सुमारे १४ हजारांच्या आसपास आहे. येत्या काही महिन्यात हा स्मार्टफोन भारतात लाँच होऊ शकतो.