शाओमीने लॉन्च केला नवा Mi A2 स्मार्टफोन, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2018 05:52 PM2018-08-08T17:52:48+5:302018-08-08T17:54:47+5:30
शाओमीने Mi A2 भारतात हा नवा स्मार्टफोन लॉन्च केला आहे. गेल्या काही दिवसांपासून या स्मार्टफोनच्या लॉन्चची ग्राहक आतुरतेने वाट पाहत होते.
शाओमीने Mi A2 भारतात हा नवा स्मार्टफोन लॉन्च केला आहे. गेल्या काही दिवसांपासून या स्मार्टफोनच्या लॉन्चची ग्राहक आतुरतेने वाट पाहत होते. या फोनची किंमत आणि यातील फीचर्सची सर्वांनाच उत्सुकता लागली होती. चला जाणून घेऊ या फोनची किंमत आणि फीचर्स....
Mi A2 हा स्मार्टफोन एल्यूमिनियम यूनिबॉडीने तयार करण्यात आला असून याला आर्क डिझाइनही देण्यात आलं आहे. तसेच या फोनला टाइप-सी यूएसबी पोर्ट देण्यात आलंय. या फोनची खासियत म्हणजे हा फोन अॅन्ड्रॉइड वन असलेला पहिला स्मार्टफोन आहे. याची फोनची जाडी 7.3 एमएम असून ही जाडी वनप्लस 6 पेक्षाही कमी आहे. वनप्लस 6 ची जाडी 7.8 एमएम आहे.
MI A2 चे स्पेसिफिकेशन
कंपनीने या फोनमध्ये 5.99 इंचाचा फुल एचडी डिस्प्ले दिला असून ज्याचं रिजोल्युशन 2160x1080 पिक्सल आहे. त्याचबरोबर कंपनीने या फोनमध्ये 4 जीबी आणि 6 जीबी रॅमसोबत 64 जीबी आणि 128 जीबी इंटरनल स्टोरेज असलेले दोन वेरिअंट लॉन्च केलं आहे. शाओमीने या फोनमध्ये ऑक्टा कोर 2.2 गीगाहर्टज क्वाडकॉम स्नॅपड्रॅगन 660 प्रोसेसर दिला आहे.
कॅमेरा कसा आहे?
शाओमीने फोनमध्ये ड्युअल कॅमरा सेटअप दिला आहे. ज्यामध्ये 12 मेगापिक्सलसोबत 20 मेगापिक्सलचा रिअर कॅमेरा दिला आहे. त्याचबरोबर कंपनीने 20 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा दिला आहे. याव्यतिरिक्त या फोनमध्ये फिंगरप्रिंट फिचर, फेस अनलॉक फिचर देण्यात आलं आहे.
बॅटरी आणि इतर फीचर्स
स्मार्टफोनची बॅटरी 3010 एमएएच असून या फोनला क्विक चार्ज 4.0 सपोर्ट देण्यात आला आहे. तसेच यामध्ये कनेक्टिविटी फीचर 4जी एलटीई, ड्युअल-बॅड वाय-फाय ए/बी/जी/एन/एसी, वाय-फाय डायरेक्ट, मीराकास्ट, ब्लूटूथ 5.0, आयआर एमीटर आणि यूएसबी टाइप-सी पोर्ट देण्यात आला आहे. एक्सेलेरोमीटर, एंबियंट लाइट सेंसर, जायरोस्कोप आणि प्रॉक्सिमिटी सेंसरही फोनमध्ये देण्यात आले आहेत. या फोनचं डायमेंशन 158.7 x 75.4x7.3 मिलीमीटर असून वजन 168 ग्रॅम आहे.
Xiaomi Mi A2 किंमत आणि लॉन्च ऑफर
Xiaomi Mi A2ची भारतात किंमत 16,999 रुपयांपासून सुरू होणार आहे. यामध्ये 4 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेज असलेलं वेरिएंट विकण्यात येणार आहे. हा फोन घेण्यासाठी इच्छुक असणारे ग्राहक Xiaomi Mi A2 ची प्री-ऑर्डर बुकिंग 9 ऑगस्टपासून करू शकतात. स्मार्टफोनची विक्री 16 ऑगस्टपासून सुरू करण्यात येणार आहे. हा एक्सक्युझिव्हली अॅमेझॉन इंडिया, मी डॉट कॉम, मी होम स्टोर आणि मीच्या अधिकृत रिटेल स्टोरमध्ये विकण्यात येणार आहेत. Reliance Jio कडून लॉन्च ऑफर देण्यात आली आहे. ग्राहकांना 2,200 रुपयांचा इंस्टेंट कॅशबॅक देण्यात येणार आहे. याव्यतिरिक्त 4.5 टीबी डेटा मोफत देण्यात येणार आहेत.