फक्त 16 हजारांत 32 इंचाचा स्मार्ट टीव्ही लाँच; जाणून घ्या Mi LED TV 4C (32 इंच) चे धमाल स्पेसिफिकेशन्स
By सिद्धेश जाधव | Published: August 5, 2021 04:25 PM2021-08-05T16:25:20+5:302021-08-05T16:35:35+5:30
Xiaomi Mi LED TV 4C 32 inch price: शाओमीने Mi LED TV 4C ची किंमत 15,999 रुपये ठेवली आहे. Mi LED TV 4C मध्ये 1GB रॅम, 8GB इंटर्नल स्टोरेज आणि 1.5GHz स्पीड असलेला क्वॉडकोर प्रोसेसर देण्यात आला आहे.
Xiaomi ने अजून एक किफायतशीर स्मार्ट टीव्ही भारतात लाँच केला आहे. कंपनीने Mi LED TV 4C स्मार्ट टीव्हीचा 32 इंचाचा मॉडेल देशात सादर केला आहे. या स्मार्ट टीव्हीची खासियत यातील क्विक वेकअप फिचर आहे. या फिचरच्या मदतीने फक्त 5 सेकंदात टीव्ही ऑन होऊन जिथे तुम्ही एखादा व्हिडीओ किंवा चित्रपट सोडला होता तिथून बघता येतो. या स्मार्ट टीव्हीमध्ये बिल्टइन क्रोमकास्ट सपोर्टसह गुगल असिस्टंट सपोर्ट देखील मिळतो.
Xiaomi Mi LED TV 4C 32 इंच मॉडेलचे स्पेसिफिकेशन्स
Xiaomi Mi LED TV 4C मध्ये 32-इंचाचा एचडी एलईडी डिस्प्ले देण्यात आला आहे. या डिस्प्लेचे रिजोल्यूशन 1366x768 पिक्सल आहे. या स्मार्ट टीव्हीमध्ये विविड पिक्चर इंजिन टेक्नॉलॉजी देण्यात आली आहे. Mi LED TV 4C मध्ये 1GB रॅम, 8GB इंटर्नल स्टोरेज आणि 1.5GHz स्पीड असलेला क्वॉडकोर प्रोसेसर देण्यात आला आहे.
या शाओमी स्मार्ट टीव्हीमध्ये अँड्रॉइड ओएस आधारित पॅचवॉल युजर इंटरफेस देण्यात आला आहे. कनेक्टिव्हिटीसाठी या स्मार्ट टीव्हीमध्ये वायफाय, ब्लूटूथ, 3 एचडीएमआय पोर्ट, 2 यूएसबी पोर्ट, ईथरनेट आणि ऑक्स पोर्ट देखील देण्यात आला आहे. शाओमी Mi LED TV 4C मध्ये 10W चे दोन स्पिकर्स आहेत जे DTS-HD सपोर्टसह सादर करण्यात आले आहेत.
Xiaomi Mi LED TV 4C 32 इंच मॉडेलची किंमत
शाओमीने Mi LED TV 4C ची किंमत 15,999 रुपये ठेवली आहे. ही स्मार्ट टीव्ही कंपनीच्या वेबसाईटसह ई-कॉमर्स साईट फ्लिपकार्टवरून 5 ऑगस्टपासून विकत घेता येईल. आयसीआयसीआय आणि अॅक्सिस बँकेच्या ग्राहकांना लाँच ऑफर अंतर्गत 10% डिस्काउंट दिला जात आहे.