10,000 रुपयांच्या डिस्काउंटसह विकत घेता येणार Xiaomi Smart TV; स्वस्तात विकत घेता येणार अँड्रॉइड टीव्ही
By सिद्धेश जाधव | Published: October 1, 2021 07:12 PM2021-10-01T19:12:15+5:302021-10-01T19:12:21+5:30
Budget Smart TV Xiaomi Mi LED TV 4C: Xiaomi ने आपल्या 43 इंचाच्या Mi LED TV 4C वर 10,000 रुपयांच्या डिस्काउंटची घोषणा केली आहे.
शाओमीने ऑगस्टमध्ये आपली नवीन स्मार्ट टीव्ही सीरिज Mi TV 5x भारतात सादर केली होती. आता कंपनीने सणासुदीच्या दिवसांमध्ये आपल्या एका स्मार्ट टीव्हीवर डिस्काउंटची घोषणा केली आहे. कंपनीने आपल्या 43 इंचाच्या Mi LED TV 4C वर 10,000 रुपयांच्या डिस्काउंटची घोषणा केली आहे. या डिस्कॉउंटनंतर हा फुल एचडी स्मार्ट टीव्ही 34,999 रुपयांच्या ऐवजी 24,999 रुपयांमध्ये विकत घेऊ शकाल. हा स्मार्ट टीव्ही कंपनीच्या वेबसाईटवरून विकत घेता येईल.
Mi LED TV 4C चे स्पेसिफिकेशन्स
Mi LED TV 4C मध्ये कंपनी 1920x1080 पिक्सल रिजोल्यूशन असलेला 43 इंचाचा फुल एचडी डिस्प्ले मिळतो. हा डिस्प्ले 178 डिग्री पर्यंतचा व्यूइंग अँगल ऑफर करतो. तसेच यात स्टँडर्ड 60Hz रिफ्रेश रेट देण्यात आला आहे. कंपनीने यात विविड पिक्चर इंजिन टेक्नॉलजीचा वापर केला आहे.
तसेच यात 1GB रॅम आणि 8GB eMMC स्टोरेज वाले मिळते. या टीव्हीमध्ये 64-बिट क्वॉड-कोर प्रोसेसरची प्रोसेसिंग पॉवर देण्यात आली आहे. हा टीव्ही अँड्रॉइड टीव्ही 9 सह पॅचवॉल 4 वर चालतो. कनेक्टिविटीसाठी या टीव्ही मध्ये वाय-फाय आणि ब्लूटूथ 4.2 व्यतिरिक्त तीन यूएसबी 2.0, तीन HDMI, AV, इथरनेट आणि इयरफोन आउटपुट पोर्ट मिळेल. कंपनीने यात 20 वॉटच्या स्पिकर्सचा वापर केला आहे. तसेच तुम्हाला गुगल व्हॉईस असिस्टंट आणि बिल्ट-इन क्रोमकास्ट हे फिचर देखील देण्यात आले आहेत.