12 जीबी रॅम, 100MP कॅमेऱ्यासह Xiaomi Mi MIX 4 गिकबेंचवर लिस्ट; 10 ऑगस्टला होणार लाँच

By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2021 03:00 PM2021-08-09T15:00:16+5:302021-08-09T15:01:59+5:30

Xiaomi Mi MIX 4 हा कंपनीचा फ्लॅगशिप स्मार्टफोन आहे. लाँचपूर्वीच समोर आले फोटो.

Xiaomi Mi Mix 4 flexes Snapdragon 888 plus on Geekbench as first poster surfaces tomorrow to launch | 12 जीबी रॅम, 100MP कॅमेऱ्यासह Xiaomi Mi MIX 4 गिकबेंचवर लिस्ट; 10 ऑगस्टला होणार लाँच

12 जीबी रॅम, 100MP कॅमेऱ्यासह Xiaomi Mi MIX 4 गिकबेंचवर लिस्ट; 10 ऑगस्टला होणार लाँच

Next
ठळक मुद्देXiaomi Mi MIX 4 हा कंपनीचा फ्लॅगशिप स्मार्टफोन आहे.लाँचपूर्वीच समोर आले फोटो.

Xiaomi मंगळवारी आपला नवा फ्लॅगशिप स्मार्टफोन Mi Mix 4 फ्लॅगशिप स्मार्टफोन लाँच करणार आहे. लाँचपूर्वी या अपकमिंग स्मार्टफोनबाबत बीवोवर एक लिक आलं आहे. यामध्ये एका खास स्पेसिफिकेशनचादेखील खुलासा करण्यात आला आहे. लिकनुसार या स्मार्टफोनमध्ये 120Hz रिफ्रेश रेट, 120W फास्ट चार्जिंग आणि AMOLED कर्व्ह्ड डिस्प्ले सारखे फीचर्स मिळणार आहेत. 

Xiaomi Mi MIX 4 फीचर्स, स्पेसिफिकेशन
शाओमीच्या स्मार्टफोनमध्ये 1080x2400 पिक्सेल रिझॉल्युशनसह 6.67 इंचाचा फुल एचडी AMOLED कर्व्ह्ड पॅनल देण्यात आलं आहे. डिस्प्लेचा टच सँपलिंग रेट 480Hz आणि रिफ्रेश रेट 120Hz आहे. तसंच फोनच्या स्क्रीनवर गोरिला ग्लास प्रोटेक्शन देण्यात आलं आहे. कंपनीनं या स्मार्टफोनमध्ये  LPDDR5 रॅम आणि UFS 3.1 स्टोरेजसोबत Snapdragon 888 चिपसेट देणार आहे. 

लिकनुसार फोनमध्ये फोटोग्राफीसाठी एलईडी फ्लॅशसोबत ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. 100 मेगापिक्सेल प्रायमरी लेन्ससोबत 13 मेगापिक्सेल फ्री फॉर्म लेन्स, 8 मेगापिक्सेलचा पेरिस्कोप टेलिफोटो लेन्स देण्यात आली आहे, ज्यात 5x ऑप्टिकल झूम आणि OIS सपोर्टही असेल. सेल्फीसाठी फोनमध्ये 20 मेगापिक्सेल अंडर डिस्प्ले कॅमेरा असेल.

ड्युअल सिम 5G
या स्मार्टफोनमध्ये 4500mAh बॅटरी देण्यात आली आहे. ती 120W वायर्ड फास्ट आणि 50W वायरलेस चार्जिंग ऑफर करते. कनेक्टिव्हिटीसाठी फोनमध्ये ड्युअल 5G, वायफाय 6E, A-GPS आणि युएसबी टाईप सी पोर्टसारखे ऑप्शन देण्यात आले आहेत. हा फोन तीन कलर ऑप्शनमध्ये उपलब्ध असेल. यामध्ये सेरॅमिक ग्रे, सेरामिक व्हाईट आणि सेरामिक ब्लॅक असे कलर ऑप्शन्स असतील. 

Web Title: Xiaomi Mi Mix 4 flexes Snapdragon 888 plus on Geekbench as first poster surfaces tomorrow to launch

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.