अंडर डिस्प्ले सेल्फी कॅमेरा असलेला Mi MIX 4 या दिवशी होणार लाँच; फ्लॅगशिप प्रोसेसरसह येणार बाजारात
By सिद्धेश जाधव | Published: August 4, 2021 06:22 PM2021-08-04T18:22:22+5:302021-08-04T18:27:09+5:30
Mi MIX 4 Launch Date: Mi MIX 4 स्मार्टफोन 10 ऑगस्टला संध्याकाळी 7:30 वाजता लाँच केला जाईल. हा शाओमीचा पहिला स्मार्टफोन असेल जो अंडर डिस्प्ले सेल्फी कॅमेऱ्यासह लाँच केला जाईल.
Xiaomi चा आगामी फ्लॅगशिप स्मार्टफोन Mi MIX 4 गेले काही दिवस चर्चेचा विषय ठरला आहे. या स्मार्टफोनचे लीक झालेले स्पेसिफिकेशन पाहून शाओमीचे चाहते या फोनच्या लाँचची आतुरतेने वाट पाहत आहेत. आता Xiaomi ने चिनी सोशल नेटवर्क विबोवर पोस्ट करून सांगितले आहे कि, Mi MIX 4 स्मार्टफोन 10 ऑगस्टला संध्याकाळी 7:30 वाजता (स्थानिक वेळेनुसार) लाँच केला जाईल. हा शाओमीचा पहिला स्मार्टफोन असेल जो अंडर डिस्प्ले सेल्फी कॅमेऱ्यासह लाँच केला जाईल. या स्मार्टफोनसोबत Mi CC11 series, Mi Pad 5 lineup आणि MIUI 13 ची घोषणा होण्याची अपेक्षा आहे.
Xiaomi Mi MIX 4 चे संभाव्य स्पेसिफिकेशन
Mi MIX 4 मध्ये 6.67-इंचचाचा फुल एचडी+ डिस्प्ले दिला जाऊ शकतो. हा एक अॅमोलेड कर्व डिस्प्ले असेल जो दोन बाजूंना असलेल्या कर्वसह सादर केला जाईल. शाओमी या स्मार्टफोनमध्ये शक्तिशाली फ्लॅगशिप प्रोसेसर देऊ शकते. रिपोर्ट्सनुसार हा स्मार्टफोन क्वालकॉमच्या Snapdragon 888+ चिपसेटसह सादर केला जाईल. हा एक 5G फोन असू शकतो. या स्मार्टफोनमध्ये 12GB पर्यंतचा लेस्टस्ट LPDDR5 रॅम आणि 256GB पर्यंतची फास्ट UFS 3.1 स्टोरेज दिली जाऊ शकते.
Mi MIX 4 मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला जाऊ शकतो. यातील मुख्य कॅमेऱ्याची माहिती मिळाली आहे, परंतु इतर दोन सेन्सर अजून गुलदस्त्यात आहेत. या फोनमध्ये 50 मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा सेन्सर दिला जाईल. या शाओमी स्मार्टफोनमध्ये 5,000mAh ची बॅटरी 120W वायर्ड फास्ट चार्जिंग आणि 70W किंवा 80W वायरलेस चार्जिंगसह देण्यात येईल. Mi MIX 4 स्मार्टफोन चीनमध्ये 6,000 RMB (अंदाजे 70,000 रुपये) मध्ये लाँच केला जाऊ शकतो.