डिस्प्लेच्या खाली सेल्फी कॅमेरा असलेला Xiaomi Mi MIX 4 लाँच; 120W फास्ट चार्जिंगसह मिळणार पावरफुल स्पेक्स 

By सिद्धेश जाधव | Published: August 11, 2021 11:35 AM2021-08-11T11:35:02+5:302021-08-11T11:41:11+5:30

Xiaomi Mi Mix 4 Launch: अंडर डिस्प्ले कॅमेरा, 108MP रियर कॅमेरा, 120W फास्ट वायर्ड चार्जिंग, स्नॅपड्रॅगन 888 प्लस इत्यादी दमदार स्पेक्ससह Xiaomi Mi Mix 4 5G चीनमध्ये लाँच झाला आहे.

Xiaomi Mi Mix 4 with under-display camera launched Price Specs Sale  | डिस्प्लेच्या खाली सेल्फी कॅमेरा असलेला Xiaomi Mi MIX 4 लाँच; 120W फास्ट चार्जिंगसह मिळणार पावरफुल स्पेक्स 

डिस्प्लेच्या खाली सेल्फी कॅमेरा असलेला Xiaomi Mi MIX 4 लाँच; 120W फास्ट चार्जिंगसह मिळणार पावरफुल स्पेक्स 

Next
ठळक मुद्देप्रोसेसिंगसाठी या स्मार्टफोनमध्ये लेटेस्ट स्नॅपड्रॅगन 888 प्लस चिपसेट आणि एड्रेनो 660 जीपीयू देण्यात आला आहे. चार्जिंग करताना बॅक पॅनलचे तापमान 37 डिग्रीच्या वर जाणार असा दावा कंपनीने केला आहे. Xiaomi Mi MIX 4 5G फोन अँड्रॉइड 11 वर आधारित मीयुआयवर चालतो.

Xiaomi ने आपला बहुप्रतीक्षित Mi MIX 4 5G स्मार्टफोन अखेरीस लाँच केला आहे. गेले कित्येक दिवस चर्चेत राहिलेला हा फ्लॅगशिप स्मार्टफोन कंपनीने आपल्या होम मार्केट चीनमध्ये लाँच केला आहे. या स्मार्टफोनच्या लाँच पूर्वी आलेले अनेक लिक्स खरे ठरले आहेत. हा फोन अंडर डिस्प्ले सेल्फी कॅमेऱ्यासह लाँच करण्यात आला आहे, म्हणजे फ्रंट पॅनलवर हा सेल्फी कॅमेरा दिसत नाही. यासाठी कंपनीने ‘कॅमेरा अंडर पॅनल’ (CUP) टेक्नॉलॉजीचा वापर केला आहे. चला जाणून घेऊया अनोख्या Xiaomi Mi MIX 4 इतर दमदार फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स.  

Xiaomi Mi MIX 4 5G चे स्पेसिफिकेशन्स 

Xiaomi Mi MIX 4 5G स्मार्टफोनमध्ये कंपनीने 6.67 इंचाचा फुलएचडी+ ओएलईडी डिस्प्ले दिला आहे. हा डिस्प्ले 120हर्ट्ज रिफ्रेश रेट आणि 480हर्ट्ज टच सॅम्पलिंग रेटला सपोर्ट करती आहे. डिस्प्ले खाली असलेल्या कॅमेऱ्याला चांगली व्हिजिबिलिटी मिळावी म्हणून 400ppi डेन्सिटी देण्यात आली आहे. तसेच कोर्निंग गोरिल्ला ग्लास विक्टसची सुरक्षा देण्यात आली आहे.  

प्रोसेसिंगसाठी या स्मार्टफोनमध्ये लेटेस्ट स्नॅपड्रॅगन 888 प्लस चिपसेट आणि एड्रेनो 660 जीपीयू देण्यात आला आहे. तसेच 12GB पर्यंत वेगवान LPDDR5 RAM आणि 512GB पर्यंत UFS 3.1 storage देण्यात आली आहे. Xiaomi Mi MIX 4 5G फोन अँड्रॉइड 11 वर आधारित मीयुआयवर चालतो. या फ्लॅगशिप शाओमी स्मार्टफोनमधील ट्रिपल रियर कॅमेरा सेटअपमध्ये 108MP चा मुख्य कॅमेरा, ओआयएस व 50एक्स झूमसह 8 MP ची पेरिस्कोप लेन्स आणि 13 MP ची अल्ट्रा वाईड अँगल लेन्स मिळते. हा फोन 20 मेगापिक्सलचा अंडर-डिस्प्ले फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. 

Xiaomi Mi MIX 4 5G फोनमध्ये 4,500एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे. ही बॅटरी 120वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीने चार्ज करता येईल, चार्जिंग करताना बॅक पॅनलचे तापमान 37 डिग्रीच्या वर जाणार असा दावा कंपनीने केला आहे. त्याचबरोबर हा फोन 50वॉट वायरलेस टेक्नॉलॉजीला देखील सपोर्ट करतो. हा फोन IP68 रेटिंग सर्टिफाइड आहे.  

Xiaomi Mi MIX 4 5G ची किंमत 

8GB RAM + 128GB - RMB 4,999 - अंदाजे 57,500 रुपये 

8GB RAM + 256GB - RMB 5,299 - अंदाजे 60,800 रुपये  

12GB RAM + 256GB - RMB 5,799 - अंदाजे 66,600 रुपये  

12GB RAM + 512GB - RMB 6,299 - अंदाजे 72,300 रुपये   

Web Title: Xiaomi Mi Mix 4 with under-display camera launched Price Specs Sale 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.