Xiaomi नं कमी केली फिटनेस बँडची किंमत; झोप, हृदयाचे ठोके होतील ट्रॅक, मिळेल हेल्थ रिपोर्ट
By सिद्धेश जाधव | Published: June 14, 2022 01:00 PM2022-06-14T13:00:52+5:302022-06-14T13:01:33+5:30
Mi Smart Band 6 ची किंमत कमी करण्यात आली आहे. हा बँड 14 दिवसांच्या बॅटरी बॅकअपसह येतो.
नवीन डिवाइस बाजारात येण्याआधी कंपनी आपल्या जुन्या डिवाइसची किंमत कमी करते. आता अशी स्थिती Xiaomi च्या Mi Smart Band 6 सोबत झाली आहे. गेल्यावर्षी ऑगस्टमध्ये भारतात आलेल्या हा फिटनेस बँडची किंमत कंपनीनं कमी केली आहे. कारण चीनमध्ये आलेला Mi Smart Band 7 लवकरच भारतीयांच्या देखील भेटीला येणार आहे. या नव्या डिवाइसला जागा करण्यासाठी कंपनीनं मी स्मार्ट बँड 6 ची किंमत कमी केली असावी.
नवी किंमत
Mi Smart Band 6 गेल्यावर्षी भारतात लाँच झाला होता तेव्हा याची किंमत 3,499 रुपये होती. परंतु आता हा बँड तुम्ही Xiaomi India च्या वेबसाईटवरून 2,999 रुपयांमध्ये विकत घेऊ शकता. कंपनीनं याचे ब्लू, लाईट ग्रीन, मरुन आणि ऑरेंज कलर व्हेरिएंट सादर केले आहेत.
Xiaomi Mi Smart Band 6 चे स्पेसिफिकेशन्स
Xiaomi Mi Smart Band 6 मध्ये शरीरातील ऑक्सिजनचे प्रमाण मोजण्यासाठी SpO2 सेन्सर देण्यात आला आहे. त्याचबरोबर यात 24/7 हार्ट रेट मॉनिटरिंग मिळते. मी बॅंड 6 मधील स्लीप ट्रॅकिंग फिचर स्लीप ब्रीदिंग क्वालिटी चेकसह देण्यात आले आहे. यातील 30 एक्सरसाइज मोड पैकी 6 मोड ऑपोअप डिटेक्ट होतात.
हा फिटनेस ट्रॅकर 5 ATM पर्यंत वॉटर रेजिस्टन्ससह बाजारात आला आहे. यातील 125mAh LiPo बॅटरी सिंगल चार्जमध्ये 14 दिवसांचा बॅकअप देते, असा दावा कंपनीने केला आहे. हा बॅंड ब्लूटूथ 5.0 कनेक्टिविटीच्या माध्यमातून Android 5.0 आणि iOS 10 किंवा त्यावरील डिवाइसेसशी कनेक्ट करता येतो.
Xiaomi Mi Smart Band 6 मध्ये 1.56-इंचाचा एज-टू-एज अॅमोलेड डिस्प्ले मिळतो. या डिस्प्लेचे रिजोल्यूशन 152×486 पिक्सल आणि डेन्सिटी 326 ppi पिक्सल आहे. 450 निट्स ब्राईटनेसला सपोर्ट करणारा हा डिस्प्ले टेंपर्ड ग्लास प्रोटेक्शन आणि अँटी फिंगरप्रिंट कोटिंगसह सादर करण्यात आला आहे.