शानदार 4K डिस्प्लेसह Mi TV 5x सीरिज भारतात लाँच; जाणून घ्या किंमत आणि स्पेसिफिकेशन्स 

By सिद्धेश जाधव | Published: August 26, 2021 02:52 PM2021-08-26T14:52:27+5:302021-08-26T14:52:53+5:30

Xiaomi Smart Living 2022: शाओमीने स्मार्ट लिविंग इव्हेंटच्या माध्यमातून भारतात Mi TV 5X सीरिजमध्ये 43 इंच, 50 इंच आणि 55 इंच असे तीन मॉडेल सादर केले आहात.  

Xiaomi mi tv 5x series with dolby atmos dolby vision features launched in india  | शानदार 4K डिस्प्लेसह Mi TV 5x सीरिज भारतात लाँच; जाणून घ्या किंमत आणि स्पेसिफिकेशन्स 

शानदार 4K डिस्प्लेसह Mi TV 5x सीरिज भारतात लाँच; जाणून घ्या किंमत आणि स्पेसिफिकेशन्स 

Next

आज शाओमीने आपल्या स्मार्ट लिविंग इव्हेंटच्या माध्यमातून Mi TV 5X सीरिज भारतात सादर केली आहे. या सीरिजमध्ये 43 इंच, 50 इंच आणि 55 इंच असे तीन मॉडेल्स सादर करण्यात आले आहेत. Android TV 10 वर आधारित या स्मार्ट टीव्ही सीरिजमध्ये 4K  डिस्प्ले देण्यात आला आहे. 7 सप्टेंबरपासून हे तिन्ही मॉडेल खरेदीसाठी उपलब्ध होतील.  

Mi TV 5x सीरिजचे फीचर्स 

या स्मार्ट टीव्ही सीरीजमध्ये 4K डिस्प्ले देण्यात आला आहे, जो Dolby Vision, HDR10+, Color Gamut, अ‍ॅडॅप्टिव ब्राईटनेस आणि MEMC पिक्चर इंजनला सपोर्ट करतो. सीरिजमधील तिन्ही मॉडेलमध्ये Dolby Atmos आणि DTS HD सराउंड साउंड फीचर मिळतो. फक्त 43 इंचाच्या मॉडेलमध्ये 30W चा स्पिकर देण्यात आला आहे, इतर दोन मॉडेल 40W च्या स्पिकरसह येतात.  

Mi TV 5x सीरिजमध्ये प्रोसेसिंगसाठी 64-बिट क्वाड कोर A55 CPU आणि Mali G52 MP2 जीपीयू देण्यात आला आहे. त्याचबरोबर 2GB RAM + 16GB इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. हे स्मार्ट टीव्ही Android TV 10 वर आधारित नवीन Patchwall 4 ऑपरेटिंग सिस्टमवर चालतात.  

या स्मार्ट टीव्ही सीरीजमध्ये कनेक्टिविटीसाठी दोन USB पोर्ट, तीन HDMI 2.1, एक इथरनेट, एक ऑप्टिकल केबल पोर्ट, Wi-Fi आणि Bluetooth असे ऑप्शन्स देण्यात आले आहेत. ही सीरिज Google Assistant व्हॉइस असिस्टंट सपोर्टसह सादर करण्यात आली आहे. तसेच Netflix, Amazon Prime Video, Disney+ Hotstar, Youtube इत्यादी OTT प्लॅटफॉर्म प्री इन्स्टॉल मिळतात.  

किंमत आणि ऑफर 

Xiaomi Mi TV 5X सीरिज 7  सप्टेंबरपासून ऑफलाईन स्टोर्स, मी होम, Mi.com आणि मोठ्या ई-कॉमर्स वेबसाईटवर खरेदीसाठी उपलब्ध होईल. या स्मार्ट टीव्हीच्या खरेदीवर HDFC बॅंक क्रेडिट कार्ड आणि EMI ट्रांजॅक्शनवर 3 हजार रुपयांचा कॅशबॅक मिळेल.  

  • 43 इंच: 31,999 रुपये  
  • 50 इंच: 41,999 रुपये  
  • 55 इंच: 47,999 रुपये 

Web Title: Xiaomi mi tv 5x series with dolby atmos dolby vision features launched in india 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.