अरे व्वा! शाओमी फोन्समध्ये येणार रॅम वाढवण्याचे फिचर; MIUI 13 ची माहिती झाली लीक 

By सिद्धेश जाधव | Published: July 21, 2021 07:34 PM2021-07-21T19:34:19+5:302021-07-21T19:34:45+5:30

Xiaomi MIUI 13 features leaks: प्रसिद्ध चिनी टिपस्टर Bald Panda ने आगामी MIUI 13 चे अनेक फीचर्स लीक केले आहेत.  

Xiaomi miui 13 features leaks comes with virtual ram technology   | अरे व्वा! शाओमी फोन्समध्ये येणार रॅम वाढवण्याचे फिचर; MIUI 13 ची माहिती झाली लीक 

अरे व्वा! शाओमी फोन्समध्ये येणार रॅम वाढवण्याचे फिचर; MIUI 13 ची माहिती झाली लीक 

googlenewsNext

Xiaomi सध्या आपल्या नेक्स्ट जेनेरेशन कस्टम युजर इंटरफेस MIUI 13 वर काम करत आहे. या आगामी युजर इंटरफेसमध्ये MIUI 12.5 च्या तुलनेत अनेक सुधारणा केल्या जातील. शाओमीने अजूनतरी या आगामी युजर इंटरफेसच्या लाँच बद्दल कोणतीही अधिकृत माहिती दिली नाही. परंतु प्रसिद्ध चिनी टिपस्टर Bald Panda ने आगामी MIUI 13 चे अनेक फीचर्स लीक केले आहेत.  

आगामी MIUI 13 मध्ये शाओमी मेमरी फ्युजन टेक्नॉलॉजी देऊ शकते. या टेक्नॉलॉजीच्या मदतीने युजर्स आपल्या मोबाईलच्या इंटरनल स्टोरेजचा वापर रॅम म्हणून करू शकतात. या अतिरिक्त वर्च्युल रॅमच्या मदतीने फोनमध्ये चांगली परफॉरमन्स आणि मल्टिटास्किंगचा अनुभव मिळेल. त्याचबरोबर या आगामी युआयमध्ये गेम्ससाठी फ्लोटिंग विंड फीचर अ‍ॅड केला जाईल. आतापर्यंत गेम्स फ्लोटिंग विंडोमध्ये वापरता येत नव्हते.  

रिपोर्ट्सनुसार MIUI 13 ऑगस्ट मध्ये लाँच केला जाऊ शकतो. Xiaomi आपल्या आगामी CC 11 सीरिज आणि Mi MIX 4 सह कस्टम स्किन MIUI 13 लाँच करू शकते. शाओमीच्या या दोन्ही स्मार्टफोन सीरीज ऑगस्टमध्ये सादर केल्या जाऊ शकतात. विशेष म्हणजे Xiaomi पुढील काही आठवड्यांत एकसाथ अनेक स्मार्टफोन्स लाँच करण्याची तयारी करत आहे. ही माहिती 3C या सर्टिफिकेशन साईटवरून समोर आली आहे. विशेष म्हणजे यात एका टॅबलेट सीरिजचा देखील समावेश आहे. Xiaomi चे Mi MIX 4, Mi CC11 आणि Mi Pad 5 series हे आगामी डिवाइस 3C या सर्टिफिकेशन साईटवर दिसले आहेत. 

Web Title: Xiaomi miui 13 features leaks comes with virtual ram technology  

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.