Xiaomi च्या फोन्सना मिळणार नवीन ऑपरेटिंग सिस्टम; रेडमीच्या ‘या’ फोन्समध्ये येतोय MIUI 13 चा अपडेट 

By सिद्धेश जाधव | Published: February 3, 2022 07:36 PM2022-02-03T19:36:41+5:302022-02-03T19:37:04+5:30

Xiaomi MIUI 13 India Rollout: Xiaomi नं भारतात आपला नवीन युआय म्हणजे MIUI 13 लाँच केला आहे. Xiaomi आणि Redmi च्या अनेक डिवाइसमध्ये ही नवी ऑपरेटिंग सिस्टम मिळेल. 

Xiaomi MIUI 13 Launched In India Will Rollout For Xiaomi And Redmi Phones From Q2 2022 | Xiaomi च्या फोन्सना मिळणार नवीन ऑपरेटिंग सिस्टम; रेडमीच्या ‘या’ फोन्समध्ये येतोय MIUI 13 चा अपडेट 

Xiaomi च्या फोन्सना मिळणार नवीन ऑपरेटिंग सिस्टम; रेडमीच्या ‘या’ फोन्समध्ये येतोय MIUI 13 चा अपडेट 

googlenewsNext

Xiaomi MIUI 13 India Rollout: Xiaomi नं अखेरीस भारतातील Xiaomi आणि Redmi स्मार्टफोन्ससाठी MIUI 13 ऑपरेटिंग सिस्टमची घोषणा केली आहे. या नव्या कस्टम स्किनमुळे स्मार्टफोन्सच्या डिव्हाइसेसची इफिशियंसी 60 टक्क्यांपर्यंत वाढेल, असा दावा कंपनीनं केला आहे. नवीन युआय सुधारित कामगिरी, रिडिफाईंड डिजाईन आणि मल्टीटास्किंग सर्विसवर लक्ष केंद्रित करतो.  

Xiaomi MIUI 13 India Rollout 

MIUI 13 को भारतात Xiaomi 11T Pro, Xiaomi 11 Lite NE 5G, Mi 11 Ultra, Mi 11X Pro, Mi 11 Lite, Redmi Note 10 Pro Max, Redmi Note 10 Pro, Redmi Note 10 आणि Redmi 10 Prime इत्यादी स्मार्टफोन्सना 2022 च्या पहिल्या तिमाहीत रोल आउट करण्यात येईल. या स्मार्टफोन्स व्यतिरिक्त अन्य डिव्हाइसेस देखील लवकरच या ऑपरेटिंग सिस्टमवर अपेडट करण्यात येतील.  

MIUI 13 मधील नवीन फीचर्स? 

MIUI 13 मध्ये चांगल्या अ‍ॅक्सेसिबिलिटीसाठी नवीन डिजाइन देण्यात आली आहे. यात स्क्रीनच्या कडेला एका फ्लोटिंग विंडोच्या माध्यमातून 10 अ‍ॅप्स अ‍ॅक्सेस करण्यासाठी एक नवीन साईडबार देण्यात आला आहे. यात नवीन लाईव्ह, स्टॅटिक वॉलपेपर आणि थीम मिळतील.  

OS च्या परफॉर्मन्समध्ये सुधार करण्यासाठी कंपनीनं एक ऑप्टीमाइज्ड फाईल स्टोरेज सिस्टम दिली आहे. ज्यामुळे स्मार्टफोनची इफिशियंसी 60 टक्क्यांपर्यंत वाढेल. दीर्घकाळ वापर केल्यास राईट आणि रीड स्पीड देखील 95 टक्क्यांपर्यंत वाढेल.  

RAM एफिशियंसी वाढवण्यासाठी प्रोसेसर प्रायोरिटी ऑप्टिमाइजेशन (PPO) चा समावेश MIUI 13 मध्ये करण्यात आला आहे. हा फिचर नको असलेल्या प्रोसेस बंद करतो आणि रॅम मोकळा करतो.  

हे देखील वाचा:

 

Web Title: Xiaomi MIUI 13 Launched In India Will Rollout For Xiaomi And Redmi Phones From Q2 2022

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.