अरे वा! 200MP + 50MP ड्युअल प्रायमरी कॅमेऱ्यासह येणार Xiaomi चा आगामी फ्लॅगशिप फोन
By सिद्धेश जाधव | Published: September 9, 2021 01:09 PM2021-09-09T13:09:07+5:302021-09-09T13:10:00+5:30
200MP Camera Phone: Xiaomi च्या आगामी फ्लॅगशिप स्मार्टफोनमध्ये दोन प्रायमरी कॅमेरे देण्यात येतील. ज्यात 50MP आणि Samsung च्या ISOCELL HP1 सेन्सर म्हणजे 200MP सेन्सरचा समावेश असेल.
Xiaomi सतत नवनवीन टेक्नॉलॉजी आपल्या स्मार्टफोन्समध्ये देत असते. आता अश्याच एका टेक्नॉलॉजीचा वापर सर्वप्रथम शाओमीस्मार्टफोनमध्ये होताना दिसू शकतो. कंपनीचा आगामी फ्लॅगशिप स्मार्टफोन ड्युअल प्रायमरी कॅमेऱ्यासह बाजारात दाखल होऊ शकतो. आतापर्यंत मल्टी कॅमेरा सेटअपमध्ये स्मार्टफोन कंपन्या एकच मुख्य कॅमेरा देत होत्या. दोन मुख्य कॅमेरा असलेला हा पहिला स्मार्टफोन ठरू शकतो.
चीनी टिप्सटर Digital Chat Station ने सांगितले आहे कि, Xiaomi च्या नेक्स्ट जनरेशन फ्लॅगशिप मॉडेल 200MP + 50MP ड्युअल प्रायमरी कॅमेऱ्यासह बाजारात येईल. हा कोणता स्मार्टफोन आहे हे मात्र समोर आले नाही. परंतु हा फोन आगामी Xiaomi 12 सीरीजमधील स्मार्टफोन असू शकतो, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
काही दिवसांपूर्वी शाओमी 12 स्मार्टफोनची माहिती आली होती कि, या फोनमध्ये 50 मेगापिक्सलचे तीन कॅमेरे असतील, ज्यात एक 5x पेरिस्कोप लेन्सचा देखील समावेश असेल. परंतु ताज्या लिक्सनुसार या फोनमध्ये 200 मेगापिक्सल आणि 50 मेगापिक्सलचा ड्युअल प्रायमरी कॅमेरा सेटअप दिला जाऊ शकतो.
अलीकडेच दक्षिण कोरियन टेक कंपनी Samsung ने ISOCELL HP1 नावाचा जगातील पहिला 200MP मोबाईल कॅमेरा सेन्सर सादर केला होता. लाँचच्या वेळी कंपनीने सांगितले होते कि या सेन्सरच्या निर्मिती आणि शिपिंगला सुरुवात झाली आहे. त्यामुळे शाओमीच्या नव्या फोनमध्ये हा कॅमेरा दिसण्याची शक्यता जास्त आहे. शाओमी किंवा सॅमसंगने याबाबत मात्र कोणतीही अधिकृत माहिती दिली नाही.