Xiaomi ने टाकले Apple ला मागे; बनली जगातील दुसरी सर्वात मोठी स्मार्टफोन कंपनी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2021 03:42 PM2021-07-16T15:42:48+5:302021-07-16T15:43:55+5:30
Canalys Smartphone Shipment Analysis: स्मार्टफोन मार्केटमध्ये यावर्षीच्या दुसऱ्या तिमाहीत सॅमसंग पहिल्या स्थानावर, शाओमी दुसऱ्या आणि अॅप्पल तिसऱ्या स्थानावर आहे.
Xiaomi अवाढव्य Apple ला मागे टाकत जागती दुसरी मोठी स्मार्टफोन कंपनी बनली आहे. चिनी स्मार्टफोन कंपनी शाओमीची शिपमेंट 83 टक्क्यांनी वाढली असल्याचा दावा कॅनालिस रिसर्चच्या रिपोर्टमध्ये करण्यात आला आहे. स्मार्टफोन शिपमेंटच्या बाबतीत पहिल्या दोन कंपन्यांमध्ये समाविष्ट होण्याची शाओमीची ही पहिलीच वेळ आहे. स्मार्टफोन शिपमेंटच्या बाबतीत सॅमसंग पहिल्या स्थानावर आहे तर शाओमी दुसऱ्या क्रमांकावर आहे. (Xiaomi beats Apple, becomes world’s 2nd largest smartphone maker)
विविध इलेक्ट्रॉनिक गॅजेट बनवणाऱ्या शाओमीने यावर्षी तिसऱ्या तिमाहीत जगातील दुसरी सर्वात मोठी कंपनी बनली आहे. द मिंटने कॅनालिस रिसर्चच्या हवाल्याने सांगितले आहे कि, स्मार्टफोन मार्केटमध्ये यावर्षीच्या दुसऱ्या तिमाहीत सॅमसंग पहिल्या स्थानावर, शाओमी दुसऱ्या आणि अॅप्पल तिसऱ्या स्थानावर आहे. सॅमसंगचा मार्केट शेयर 19 टक्के, शाओमीचा 17 टक्के आणि अॅप्पलची बाजारातील हिस्सेदारी 14 टक्के होती.
स्वस्त आणि किफायतशीर स्मार्टफोन्स विकण्याचा फायदा शाओमीला झाल्याचे कॅनालिस रिसर्चच्या रिपोर्टमध्ये सांगण्यात आले आहे. सॅमसंग आणि अॅप्पलच्या तुलनेत शाओमीचे स्मार्टफोन अनुक्रमे 40% आणि 75% पर्यंत स्वस्त आहेत, असे देखील रिपोर्टमध्ये नमूद करण्यात आला आहे. शाओमीची लॅटिन अमेरिकेतील शिपमेंट 300 टक्के, आफ्रिकेतील 150 टक्के आणि पश्चिम युरोपमध्ये 50 टक्क्यांनी वाढली आहे.