जागतिक बाजारात प्रथमच Xiaomi नंबर 1; सॅमसंग आणि अ‍ॅप्पलला टाकले मागे 

By सिद्धेश जाधव | Published: August 6, 2021 05:31 PM2021-08-06T17:31:05+5:302021-08-06T17:33:14+5:30

Xiaomi Becomes Number One: शाओमीने जून 2021 मध्ये सर्वात जास्त स्मार्टफोन शिप करून सॅमसंग आणि अ‍ॅप्पल सारख्या कंपन्यांना मात दिली आहे.

Xiaomi overtakes samsung and apple to became number one smartphone brand in the word for the first time  | जागतिक बाजारात प्रथमच Xiaomi नंबर 1; सॅमसंग आणि अ‍ॅप्पलला टाकले मागे 

जागतिक बाजारात प्रथमच Xiaomi नंबर 1; सॅमसंग आणि अ‍ॅप्पलला टाकले मागे 

Next

जागतिक बाजारात शाओमीने Samsung आणि Apple ला मागे टाकत प्रथम स्थान मिळवले आहे. कंपनीच्या 11 वर्षाच्या इतिहासात प्रथमच शाओमीने ही कामगिरी केली आहे. जागतिक बाजारातून होणारा हुवावेचा अस्त थेट चिनी कंपनी Xiaomi ला फायदेशीर ठरत आहे. ग्लोबल मार्केटमध्ये स्मार्टफोन शिपमेंटमध्ये शाओमीने सर्व दिग्गज कंपन्यांना मागे टाकले आहे. शाओमीने जून 2021 मध्ये सर्वात जास्त स्मार्टफोन शिप करून सॅमसंग आणि अ‍ॅप्पल सारख्या कंपन्यांना मात दिली आहे.  

कॉउंटरपॉईंटच्या रिपोर्टनुसार, जून मध्ये शाओमीचा ग्लोबल मार्केटमध्ये 17.1 टक्के हिस्सा होता. तर सॅमसंगने 15.7 टक्के बाजारावर कब्जा केला तर 14.3 टक्के हिस्स्यासह अ‍ॅप्पल तिसऱ्या क्रमांकावर आहे. गेल्या 26 महिन्यांत शाओमीची स्मार्टफोन शिपमेंट सतत वाढत आहे. 

शाओमीच्या 2021 च्या दुसऱ्या तिमाहीतील यशामागे दोन कारणे सांगण्यात आली आहेत. यातील पहिले कारण म्हणजे शाओमीला चीन, युरोप, मध्य पूर्व आणि आफ्रिकेत हुवावेच्या युजर बेसचा फायदा मिळाला आहे. दुसरीकडे सॅमसंगच्या सप्लाय चेनमध्ये व्यत्यय आल्याचा फायदा देखील शाओमीला झाला आहे. सॅमसंग स्मार्टफोन्सची सर्वात जास्त निर्मिती व्हिएतनाम होते आणि व्हिएतनाममध्ये कोरोना विषाणूच्या नव्या लाटेत अडकला आहे. त्यामुळे येणारे काही महिने शाओमीच्या नावे राहण्याची शक्यता आहे.  

Web Title: Xiaomi overtakes samsung and apple to became number one smartphone brand in the word for the first time 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.