सॅमसंगला जोरदार झटका! Xiaomi चा नवा आणि दमदार टॅबलेट डिस्काउंटसह उपलब्ध
By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2022 04:06 PM2022-05-03T16:06:08+5:302022-05-03T16:06:24+5:30
Xiaomi Pad 5 टॅबलेट 11 इंचाचा डिस्प्ले, 6GB RAM, 120Hz रिफ्रेश रेट आणि 8720mAh बॅटरीसह भारतात आला आहे.
Xiaomi नं जवळपास सात वर्षानंतर भारतात अँड्रॉइड टॅबलेट सादर केला आहे. इतकी वर्ष या सेगमेंटमध्ये सॅमसंगचा दबदबा होता. यंदा नोकिया, मोटोरोला आणि रियलमीनं टॅबलेट सादर केले आहेत. परंतु Xiaomi Pad 5 टॅबलेटमधील 11 इंचाचा डिस्प्ले, 6GB RAM, 120Hz रिफ्रेश रेट आणि 8720mAh बॅटरी या स्पेक्सना तोड देणारा डिवाइस या किंमतीत भारतात उपलब्ध नाही.
किंमत आणि ऑफर
Xiaomi Pad 5 चे दोन व्हेरिएंट भारतात आले आहेत. 128GB स्टोरेज मॉडेलची किंमत किंमत 26,999 रुपये ठेवण्यात आली आहे. तर 256GB स्टोरेज असलेला व्हेरिएंट 28,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. हा टॅब कंपनीच्या अधिकृत वेबसाईटसह अॅमेझॉनवरून विकत घेता येईल. HDFC बँकेच्या कार्ड धारकांना 2000 रुपयांचा इन्स्टंट डिस्काउंट देण्यात येईल.
Xiaomi Pad 5 चे स्पेसिफिकेशन्स
Xiaomi Pad 5 मध्ये 11 इंचाचा WQHD+ ट्रूटोन डिस्प्ले मिळतो. हा डिस्प्ले 120Hz रिफ्रश रेट 1600 X 2560 पिक्सल रिजोल्यूशनला सपोर्ट करतो. प्रोसेसिंगसाठी यात कंपनीने क्वॉलकॉमच्या स्नॅपड्रॅगन 860 प्रोसेसरचा वापर केला आहे. यात 6GB पर्यंत RAM आणि 256GB पर्यंतची इनबिल्ट स्टोरेज मिळते.
या टॅबलेटमध्ये एलईडी फ्लॅशसह 13MP चा रियर कॅमेरा मिळतो. यातील फ्रंट कॅमेऱ्याचे रिजोल्यूशन 8MP आहे. Xiaomi Pad 5 मध्ये 8,720mAh ची मोठी बॅटरी 33W फास्ट चार्जिंग सपोर्टसह मिळते. जी 10 तास गेमिंग 16 तास व्हिडीओ प्लेबॅक देऊ शकते. कनेक्टिविटीसाठी यात Bluetooth 5, Wi-Fi आणि USB Type C पोर्ट मिळतो.