सात वर्षांनंतर Xiaomi नं सादर केला ‘हा’ डिवाइस; कमी किंमतीत प्रीमियम फिचर, सॅमसंग-रियलमीच्या चिंतेत वाढ

By सिद्धेश जाधव | Published: April 27, 2022 05:26 PM2022-04-27T17:26:32+5:302022-04-27T17:26:44+5:30

Xiaomi Pad 5 टॅबलेट भारतात Qualcomm Snapdragon 860 प्रोसेसर, 120Hz रिफ्रेश रेट 11 इंचाचा डिस्प्ले, 6GB RAMआणि 8720mAh बॅटरीसह आला आहे.

Xiaomi Pad 5 With Snapdragon 860 Processor Launched In India Check Price   | सात वर्षांनंतर Xiaomi नं सादर केला ‘हा’ डिवाइस; कमी किंमतीत प्रीमियम फिचर, सॅमसंग-रियलमीच्या चिंतेत वाढ

सात वर्षांनंतर Xiaomi नं सादर केला ‘हा’ डिवाइस; कमी किंमतीत प्रीमियम फिचर, सॅमसंग-रियलमीच्या चिंतेत वाढ

Next

Xiaomi नं गेली सात वर्ष अँड्रॉइड टॅबलेट सेगमेंटमध्ये एकही डिवाइस सादर केला नव्हता. त्यामुळे या सेगमेंटमध्ये ब्रँडेड टॅबलेटसाठी सॅमसंग हा एक पर्याय ग्राहकांकडे उपलब्ध होता. यंदा रियलमी, मोटोरोला आणि नोकियाने देखील आपले बजेट टॅबलेट भारतात सादर केले आहेत. आज शाओमीनं आपला प्रीमियम Xiaomi Pad 5 टॅबलेट 11 इंचाचा डिस्प्ले, 6GB RAM, 120Hz रिफ्रेश रेट आणि 8720mAh बॅटरीसह भारतात सादर केला आहे.  

Xiaomi Pad 5 ची भारतातील किंमत 

Xiaomi Pad 5 चे दोन व्हेरिएंट भारतात आले आहेत. 128GB स्टोरेज मॉडेलची किंमत किंमत 26,999 रुपये ठेवण्यात आली आहे. तर 256GB स्टोरेज असलेला व्हेरिएंट 28,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. हा टॅब 3 मेला दुपारी 12 वाजल्यापासून अ‍ॅमेझॉनवरून विकत घेता येईल. 7 मे पर्यंत 2000 रुपयांचा डिस्काउंट मिळेल तसेच HDFC बँकेच्या कार्डवर 2000 रुपयांचा इन्स्टंट डिस्काउंटची घोषणा देखील करण्यात आली आहे. त्यामुळे बेस व्हेरिएंट फक्त 22,999 रुपयांमध्ये उपलब्ध होईल.  

Xiaomi Pad 5 चे स्पेसिफिकेशन्स  

Xiaomi Pad 5 मध्ये 11 इंचाचा WQHD+ ट्रूटोन डिस्प्ले मिळतो. हा डिस्प्ले 120Hz रिफ्रश रेट 1600 X 2560 पिक्सल रिजोल्यूशनला सपोर्ट करतो. प्रोसेसिंगसाठी यात कंपनीने क्वॉलकॉमच्या स्नॅपड्रॅगन 860 प्रोसेसरचा वापर केला आहे. यात 6GB पर्यंत RAM आणि 256GB पर्यंतची इनबिल्ट स्टोरेज मिळते. 

या टॅबलेटमध्ये एलईडी फ्लॅशसह 13MP चा रियर कॅमेरा मिळतो. यातील फ्रंट कॅमेऱ्याचे रिजोल्यूशन 8MP आहे. Xiaomi Pad 5 मध्ये 8,720mAh ची मोठी बॅटरी 33W फास्ट चार्जिंग सपोर्टसह मिळते. जी 10 तास गेमिंग 16 तास व्हिडीओ प्लेबॅक देऊ शकते. कनेक्टिविटीसाठी यात Bluetooth 5, Wi-Fi आणि USB Type C पोर्ट मिळतो. 

Web Title: Xiaomi Pad 5 With Snapdragon 860 Processor Launched In India Check Price  

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :xiaomiशाओमी