Xiaomi च्या चाहत्यांसाठी वाईट बातमी; कंपनीने पुन्हा वाढवली स्वस्त स्मार्टफोनची किंमत  

By सिद्धेश जाधव | Published: September 1, 2021 11:53 AM2021-09-01T11:53:30+5:302021-09-01T11:53:49+5:30

Xiaomi Redmi 9 Price In India: शाओमी इंडियाने स्वस्त स्मार्टफोन रेडमी 9 ची किंमत वाढवली आहे. या स्मार्टफोनचे दोन्ही व्हेरिएंट आता 500 रुपये जास्त देऊन विकत घ्यावे लागतील.

Xiaomi phone price hike in india Redmi 9 smartphone increase by rs 500  | Xiaomi च्या चाहत्यांसाठी वाईट बातमी; कंपनीने पुन्हा वाढवली स्वस्त स्मार्टफोनची किंमत  

Xiaomi च्या चाहत्यांसाठी वाईट बातमी; कंपनीने पुन्हा वाढवली स्वस्त स्मार्टफोनची किंमत  

Next

काही दिवसांपूर्वी रियलमी आणि शाओमीमध्ये नक्कल करण्याच्या बाबतीत ट्विटर युद्ध सुरु होते. कदाचित या ट्विटर युद्धात दोन्ही कंपन्यांचे एकमत होणार नाही. परंतु स्मार्टफोन्सच्या किंमती वाढवण्याच्या बाबतीत दोन्ही कंपन्यांचे एकमत होत असताना दिसत आहे. गेले काही दिवस या दोन्ही कंपन्या आपल्या बजेट आणि लो बजेट स्मार्टफोन्सच्या किंमती वाढवत आहेत. आता शाओमीने आपल्या अजून एका मोबाईल फोनची किंमत वाढवली आहे. आजपासून Xiaomi Redmi 9 स्मार्टफोन 500 रुपयांनी महागला आहे.  

Xiaomi Redmi 9 ची नवीन किंमत

शाओमी इंडियाने स्वस्त स्मार्टफोन रेडमी 9 ची किंमत वाढवली आहे. या स्मार्टफोनचे दोन्ही व्हेरिएंट आता 500 रुपये जास्त देऊन विकत घ्यावे लागतील. 1 सप्टेंबरपासून हा स्मार्टफोन फोन ऑफलाइन रिटेल स्टोर्सवर नव्या किंमतीसह उपलब्ध होईल. Redmi 9 स्मार्टफोनचा 8,999 रुपयांमध्ये मिळणार 4GB RAM आणि 64GB Storage व्हेरिएंट आता 9,499 रुपयांमध्ये विकत घेता येईल. तर फोनच्या 4GB RAM आणि 128GB Storage व्हेरिएंटची किंमत 9,999 रुपयांवरून 10,499 रुपये करण्यात आली आहे. 

Xiaomi Redmi 9 चे स्पेसिफिकेशन्स 

Redmi 9 मध्ये 20:9 अस्पेक्ट रेशियो आणि 1600 × 720 पिक्सल रिजोल्यूशनसह 6.53 इंचाचा एचडी+ एलसीडी डिस्प्ले देण्यात आला आहे. हा फोन अँड्रॉइड 10 आधारित मीयूआई 11 वर चालतो. प्रोसेसिंगसाठी या फोनमध्ये मीडियाटेकचा हीलियो जी35 चिपसेट देण्यात आला आहे. तर ग्राफिक्ससाठी IMG PowerVR GE8320 जीपीयू मिळतो. 

फोटोग्राफीसाठी Redmi 9 मध्ये डुअल रियर कॅमेरा मिळतो. यात 13 मेगापिक्सलचा मुख्य सेन्सर आणि 2 मेगापिक्सलच्या सेकेंडरी कॅमेरा देण्यात आला आहे. या फोनमधील फ्रंट कॅमेरा 5 मेगापिक्सलचा आहे. पावर बॅकअपसाठी या फोनमध्ये 5,000एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे. 

Web Title: Xiaomi phone price hike in india Redmi 9 smartphone increase by rs 500 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.