भूकंपाची वेगवान सूचना देण्यासाठी उपयोगी ठरतील Xiaomi चे मोबाईल; कंपनी करत आहे नव्या फिचरची तयारी 

By सिद्धेश जाधव | Published: June 7, 2021 06:33 PM2021-06-07T18:33:29+5:302021-06-07T18:34:43+5:30

Xiaomi Earthquake Monitoring System: Xiaomi ने सांगितले आहे कि मोबाईल फोनमधील सेन्सर कंपनांची माहिती गोळा करून एज कंप्यूटिंगच्या माध्यमातून भूकंपाची माहिती देतील. 

Xiaomi phones will get earthquake monitoring system with early alert in china   | भूकंपाची वेगवान सूचना देण्यासाठी उपयोगी ठरतील Xiaomi चे मोबाईल; कंपनी करत आहे नव्या फिचरची तयारी 

भूकंपाची वेगवान सूचना देण्यासाठी उपयोगी ठरतील Xiaomi चे मोबाईल; कंपनी करत आहे नव्या फिचरची तयारी 

Next

Xiaomi च्या ऑपरेटिंग सिस्टम MIUI मध्ये एक Earthquake Alert फीचर देण्यात आले आहे, जे युजरला भूकंपाची सूचना देते, हे फिचर फक्त चीनमध्ये देण्यात आले आहे. 2010 मध्ये आलेल्या या फीचरमुळे अनेक भागांमध्ये 35 पेक्षा जास्त भूकंपाची यशस्वी सूचना देण्यात आली आहे, अशी माहिती कंपनीने दिली आहे. हे फीचर आता फक्त भूकंप येण्याची सूचना देणार नाही तर यामुळे फोन्स आता भूकंपचे निरीक्षण करण्याचे देखील काम करतील.  

Weibo अकॉउंटवर Xiaomi ने 3 जून रोजी एक घोषणा केली होती. यात कंपनीने सांगितले होते कि आता युजर्सना भूकंप येण्याची सूचना मिळेल, त्याचबरोबर त्यांचा फोन भूकंप मॉनिटर पण करेल. हे फीचर चीनमधील सर्व MIUI फोनमध्ये देण्यात येईल. Earthquake warning alert फीचर सध्या फक्त चीनपुरते मर्यादित ठेवण्यात आले आहे. या फीचरसाठी कंपनीने चेंगदू हाई-टेक डिजास्टर मिटिगेशन इंस्टीट्यूटची मदत घेतली आहे.  

या नवीन फिचरमुळे भूकंप मॉनिटर करण्यासाठी शाओमी फोन्सची मदत घेतली जाईल, त्यामुळे खर्च कमी होऊन मॉनिटर्सची संख्या वाढेल. मोबाईलमधील सेन्सरच्या माध्यमातून घेतलेली माहिती अर्ली वार्निंग सेंटरला पाठवली जाईल. त्या माहितीवर प्रक्रिया केल्यावर भूकंप आहे कि नाही हे ठरवले जाईल आणि त्यानुसार सूचना युजर्सना पाठवली जाईल.  

गेल्या महिन्यात कंपनीने दिलेल्या आकडेवारीनुसार, नोव्हेंबर 2019 पासून, भूकंपाच्या सूचना 12 लाखांपेक्षा जास्त लोकांना पाठवण्यात आल्या आहेत. याद्वारे 4.0 पेक्षा जास्त तीव्रता असलेल्या 35 भूकंपाची माहिती युजर्सना देण्यात आली आहे.  

Web Title: Xiaomi phones will get earthquake monitoring system with early alert in china  

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.