लाँच होण्याआधीच Redmi च्या स्वस्त स्मार्टफोननं दाखवला दम; मोठया बॅटरीसह येणार बाजारात
By सिद्धेश जाधव | Published: February 9, 2022 12:43 PM2022-02-09T12:43:14+5:302022-02-09T12:43:32+5:30
Redmi 10 (2022): गिकबेंचच्या लिस्टिंगमधून Redmi 10 (2022) च्या प्रोसेसर, रॅम आणि ऑपरेटिंग सिस्टमची माहिती मिळाली आहे. रेडमीचा हा आगामी स्मार्टफोन वेबसाईटवर 21121119VL या मॉडेल नंबरसह लिस्ट करण्यात आला आहे.
Redmi 10 (2022) स्मार्टफोन लवकरच बाजारात सादर केला जाऊ शकतो. हा कंपनीचा बजेट फ्रेंडली स्मार्टफोन असेल. आता हा फोन बेंचमार्किंग साईट गिकबेंचवर लिस्ट झाला आहे. या लिस्टिंगमधून या हँडसेटच्या प्रोसेसर, रॅम आणि ऑपरेटिंग सिस्टमची माहिती मिळाली आहे. रेडमीचा हा आगामी स्मार्टफोन वेबसाईटवर 21121119VL या मॉडेल नंबरसह लिस्ट करण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी या सीरिजमधील Redmi 10A चा ग्लोबल व्हर्जन देखील Geekbench आणि FCC वर लिस्ट झाला होता.
Redmi 10 (2022) चे संभाव्य स्पेसिफिकेशन्स
गिकबेंचवर Redmi 10 (2022) स्मार्टफोन MediaTek MT6769H प्रोसेसरसह लिस्ट करण्यात आला आहे. कदाचित हा MediaTek Helio G88 चिपसेट असू शकतो. सोबत सहा कोर 1.80 GHz आणि दोन कोर 2.0 GHz वर क्लॉक केलेला प्रोसेसर आहे. या स्मार्टफोनमध्ये 4GB रॅम दिला जाऊ शकतो. तसेच हा फोन अँड्रॉइड 11 सह बाजारात येईल. रेडमी 10 (2022) ला गिकबेंचच्या सिंगल कोर टेस्टमध्ये 367 आणि मल्टी कोर टेस्टमध्ये 1253 पॉईंट्स मिळाले आहेत.
Redmi 10 (2022) स्मार्टफोनच्या अन्य स्पेक्सची माहिती मात्र गिकबेंचवरून मिळाली नाही. परंतु हा एक बजेट फ्रेंडली स्मार्टफोन असेल एवढं मात्र निश्चित आहे. याआधी आलेल्या सर्टिफिकेशनवरून या स्मार्टफोनमधील 4900mAh च्या बॅटरीची माहिती मिळाली आहे. ही बॅटरी 22W फास्ट चार्जिंग स्पीडनं चार्ज करता येईल.
हे देखील वाचा:
हे आहेत 6 'बेस्ट' पासवर्ड मॅनेजर अॅप्स जे तुम्हाला कधीच विसरू देणार नाहीत महत्वाचे लॉगिन डिटेल्स