Redmi 10 सह अजून एक स्वस्त स्मार्टफोन येणार बाजारात; वेबसाईट लिस्टिंगमधून झाला खुलासा
By सिद्धेश जाधव | Published: August 17, 2021 06:06 PM2021-08-17T18:06:49+5:302021-08-17T18:22:00+5:30
Redmi 10 Prime Launch: Redmi 10 Prime बाबत कोणतीही अधिकृत माहिती कंपनीने दिली नाही. परंतु हा स्मार्टफोन Redmi 10 सह लाँच केला जाईल, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.
Xiaomi आपल्या रेडमी लाईनअपचा लवकरच विस्तार करणार आहे. लवकरच नवीन लो बजेट फोन Redmi 10 बाजारात येणार आहे. गेले काही दिवस कंपनी आगामी Redmi 10 स्मार्टफोनच्या काही स्पेसिफिकेशन्सची माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली आहे. आता अशी माहिती समोर आली आहे कि कंपनी Redmi 10 सह Redmi 10 Prime देखील लाँच करणार आहे. Redmi 10 Prime स्मार्टफोन CEIR IMEI डेटाबेसवर दिसला आहे.
Redmi 10 Prime स्मार्टफोन IMEI वेबसाइटवर लिस्ट करण्यात आला आहे, अशी माहिती टिपस्टर मुकुल शर्माने दिली आहे. लिस्टिंगमधून या फोनच्या मॉडेल नंबर आणि मॉनीकरची माहिती मिळाली आहे. Redmi Prime स्मार्टफोन या वेबसाईटवर मॉडेल नंबर 21061119BI सह लिस्ट करण्यात आला आहे. Redmi 10 Prime बाबत कोणतीही अधिकृत माहिती कंपनीने दिली नाही. परंतु हा स्मार्टफोन Redmi 10 सह लाँच केला जाईल, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.
हे देखील वाचा: Xiaomi Mi 11T स्मार्टफोनचे स्पेसिफिकेशन्स लीक; 120Hz डिस्प्ले, 64MP ट्रिपल रियर कॅमेऱ्यासह होणार लाँच
Xiaomi Redmi 10 चे स्पेसिफिकेशन्स
लिक्स आणि बातम्यांमधून रेडमी 10 चे काही स्पेसिफिकेशन्स लीक झाले आहेत. या फोनमध्ये 6.5-इंचाचा एलसीडी डिस्प्ले 90 हर्ट्ज रिफ्रेश रेट आणि 2400x1080 पिक्सल रिजोल्यूशनसह देण्यात येईल. वर सांगितल्याप्रमाणे Redmi 10 मध्ये मीडियाटेक हीलियो जी88 चिपसेट दिला जाऊ शकतो. या फोनमध्ये 6GB पर्यंतचा रॅम आणि 128GB पर्यंतची स्टोरेज मिळू शकते. हा रेडमी फोन अँड्रॉइड 11 आधारित मीयुआय 12.5 वर सादर केला जाईल.
हे देखील वाचा: 18GB रॅम, 6,000mAh बॅटरी आणि स्नॅपड्रॅगन 888+ प्रोसेसरसह दमदार ASUS ROG Phone 5S लाँच
Xiaomi Redmi 10 मध्ये क्वॉड रियर कॅमेरा सेटअप मिळू शकतो. ज्यात एलईडी फ्लॅशसह 50 मेगापिक्सलचा मुख्य सेन्सर, 8 मेगापिक्सलची अल्ट्रा वाईड अँगल लेन्स, 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेन्स आणि 2 मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर असेल. हा रेडमी फोन 8 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करू शकतो. Redmi 10 मध्ये पावर बॅकअपसाठी 18वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीसह 5,000एमएएचची बॅटरी देण्यात येईल.