50MP कॅमेरा, 90Hz रिफ्रेश रेट आणि 5000mAh बॅटरीसह Xiaomi Redmi 10 स्मार्टफोन लाँच; जाणून घ्या किंमत 

By सिद्धेश जाधव | Published: August 19, 2021 11:38 AM2021-08-19T11:38:37+5:302021-08-19T11:41:36+5:30

Redmi 10 Launch: Xiaomi ने मलेशियात आपली बजेट स्मार्टफोन सीरीज Redmi 10 लाँच केली आहे. लवकरच हा स्मार्टफोन भारतात देखील सादर केला जाऊ शकतो.  

Xiaomi redmi 10 smartphone launched with 50mp camera helio g88 chipset and 5000mah battery  | 50MP कॅमेरा, 90Hz रिफ्रेश रेट आणि 5000mAh बॅटरीसह Xiaomi Redmi 10 स्मार्टफोन लाँच; जाणून घ्या किंमत 

50MP कॅमेरा, 90Hz रिफ्रेश रेट आणि 5000mAh बॅटरीसह Xiaomi Redmi 10 स्मार्टफोन लाँच; जाणून घ्या किंमत 

Next
ठळक मुद्देमलेशियात Redmi 10 स्मार्टफोनचा बेस व्हेरिएंट 4GB RAM + 64GB स्टोरेजसह सादर करण्यात आला आहे. या रेडमी नव्या फोनमधील 5,000mAh ची बॅटरी 18W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.  लाँच पूर्वी शाओमीने सांगितल्याप्रमाणे या स्मार्टफोनमध्ये मीडियाटेकचा Helio G88 चिपसेट देण्यात आला आहे.

Xiaomi ने आपली बजेट स्मार्टफोन सीरीज Redmi 10 सर्वप्रथम मलेशियात लाँच केली आहे. ही सीरिज गेल्यावर्षी लाँच झालेल्या Redmi 9 ची जागा घेणार आहे. कंपनीने रेडमी 10  स्मार्टफोनमध्ये अनेक मोठे बदल केले आहेत. मलेशियात या स्मार्टफोनचे दोन रॅम आणि स्टोरेज व्हेरिएंट सादर करण्यात आले आहेत. जागतिक बाजारात हा फोन तीन व्हेरिएंट्समध्ये सादर केला जाणार असल्याची माहिती कंपनीने दिली आहे. लवकरच हा स्मार्टफोन भारतात देखील सादर केला जाऊ शकतो.  

Redmi 10 चे फिचर आणि स्पेसिफिकेशन्स 

Xiaomi Redmi 10 स्मार्टफोनमध्ये 6.5-इंचाचा आयपीएस एलसीडी डिस्प्ले देण्यात आला आहे. पंच होल कट-आऊटसह येणार हा डिस्प्ले 90Hz रिफ्रेश रेट आणि 20:9 अस्पेक्ट रेशियोला सपोर्ट करतो. या डिस्प्लेला गोरिल्ला ग्लास 3 ची सुरक्षा देण्यात आली आहे. सिक्योरिटीसाठी यात उजव्या पॅनलवर पावर बटनमध्ये फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे. तसेच यात ड्युअल 4G VoLTE, Wi-Fi 5, Bluetooth 5.0, GPS, IR blaster, Qj 3.5mm ऑडियो जॅक असे कनेक्टिव्हिटी ऑप्शन देण्यात आले आहेत.

हे देखील वाचा:  फक्त 6,699 रुपयांमध्ये Itel A48 भारतात लाँच; सोबत मिळणार वन टाइम स्क्रीन रिप्लेसमेंट मोफत

लाँच पूर्वी शाओमीने सांगितल्याप्रमाणे या स्मार्टफोनमध्ये मीडियाटेकचा Helio G88 चिपसेट देण्यात आला आहे. हा एक गेमिंग चिपसेट आहे असे कंपनीने म्हटले होते. या रेडमी फोनमध्ये 6GB पर्यंतचा LPDDR4x RAM आणि 128GB पर्यंतची eMMC स्टोरेज देण्यात आली आहे. हा बजेट स्मार्टफोन Android 11 ऑपरेटिंग सिस्टम आधारित MIUI 12.5 वर चालतो.  

Xiaomi Redmi 10 मध्ये कंपनीने क्वॉड रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. यात 50-मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा देण्यात आला आहे, त्याचबरोबर 8-मेगापिक्सलची अल्ट्रा वाईड लेन्स, 2 मेगापिक्सलचा मॅक्रो कॅमेरा आणि 2 मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर कॅमेरा मिळतो. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या फोनमध्ये 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळतो. या रेडमी नव्या फोनमधील 5,000mAh ची बॅटरी 18W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.  

हे देखील वाचा: 5000mAh बॅटरीसह सॅमसंगचा लो बजेट स्मार्टफोन भारतात सादर; जाणून घ्या Galaxy A03s स्मार्टफोनची किंमत

Redmi 10 ची किंमत 

मलेशियात Redmi 10 स्मार्टफोनचा बेस व्हेरिएंट 4GB RAM + 64GB स्टोरेजसह सादर करण्यात आला आहे. तर मोठ्या व्हेरिएंटमध्ये 6GB RAM + 128GB स्टोरेज मिळते. बेस व्हेरिएंटची किंमत 649 MYR (सुमारे 11,300 रुपये) आणि मोठ्या व्हेरिएंटची किंमत 749 MYR (सुमारे 13,000 रुपये) आहे.  

Web Title: Xiaomi redmi 10 smartphone launched with 50mp camera helio g88 chipset and 5000mah battery 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.