Redmi चा धमाकेदार स्मार्टफोन लवकरच होणार लाँच; असे असू शकतात Redmi 10 चे स्पेसिफिकेशन्स
By सिद्धेश जाधव | Published: August 9, 2021 12:29 PM2021-08-09T12:29:41+5:302021-08-09T12:33:40+5:30
Xiaomi Redmi 10 specifications leak: जुन्या Redmi 9 सीरिजच्या तुलनेत Redmi 10 सीरिजच्या डिजाईनमध्ये कंपनीने बदल केल्याचे दिसत आहे.
Xiaomi आपल्या स्वस्त सीरिजचा विस्तार लवकरच करणार आहे. गेल्यावर्षी लाँच झालेल्या Redmi 9 सीरीज आता कंपनीने Redmi 10 सीरिजवर काम करत आहे. शाओमीने रेडमी 10 च्या लाँचची कोणतीही अधिकृत घोषणा केली नाही, परंतु, या आगामी शाओमीस्मार्टफोनचे रेंडर आणि स्पेसिफिकेशन्स आधीच लीक झाले आहेत. आता प्रसिद्ध टिप्सटर मुकुल शर्माने Redmi 10 स्मार्टफोनचे काही फोटो लीक केले आहेत. या फोटोजवरून या स्मार्टफोनच्या डिजाईनची माहिती समोर आली आहे. (Redmi 10 listed on E-commerce websites ahead of launch)
मुकुल शर्माने शाओमीच्या Redmi 10 स्मार्टफोनचे काही फोटो सोशल मीडियावर शेयर केले आहेत. या फोटोजमधून या स्मार्टफोनच्या डिजाइन आणि स्पेसिफिकेशन्सची माहिती लीक झाली आहे. हा आगामी रेडमी फोन एका ई-कॉमर्स वेबसाईटवर लिस्ट झाल्याची माहिती मुकुलने दिली आहे. जुन्या Redmi 9 सीरिजच्या तुलनेत Redmi 10 सीरिजच्या डिजाईनमध्ये कंपनीने बदल केल्याचे दिसत आहे.
Xiaomi Redmi 10 चे लीक स्पेसिफिकेशन्स
Xiaomi Redmi 10 मध्ये 6.5-इंचाचा फुल एचडी+ डिस्प्ले दिला जाऊ शकतो. हा डिस्प्ले 90Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करणारा एलसीडी डिस्प्ले पॅनल असू शकतो. या आगामी रेडमी फोनमध्ये कंपनी MediaTek Dimensity G88 चिपसेट आणि Mali G52 GPU देऊ शकते. या फोनमध्ये 6GB पर्यंत रॅम आणि 128GB पर्यंतची स्टोरेज मिळू शकते. या फोनमध्ये Android 11 आधारित MIUI 12 मिळू शकतो.
Redmi 10 स्मार्टफोनच्या मागे क्वाड कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यातील मुख्य सेन्सर 50 मेगापिक्सलचा असेल, त्याचबरोबर एक 8 मेगापिक्सल आणि आणि दोन 2 मेगापिक्सलचे सेन्सर मिळू शकतात. Redmi 10 स्मार्टफोनमध्ये 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा सेन्सर दिला जाऊ शकतो. हा रेडमी फोन 5000mAh बॅटरी आणि 18W फास्ट चार्जिंग सपोर्टसह सादर केला जाऊ शकतो.