Xiaomi Redmi 10 च्या चिपसेटचा खुलासा; मीडियाटेकच्या नव्या गेमिंग चिपसेटसह येणार बाजारात 

By सिद्धेश जाधव | Published: August 17, 2021 12:54 PM2021-08-17T12:54:43+5:302021-08-17T12:59:23+5:30

Redmi 10 Processer: मीडियाटेकचा हीलियो जी88 चिपसेट गेल्याच महिन्यात सादर केला गेला आहे. Redmi 10 मध्ये मीडियाटेक हीलियो जी88 चिपसेट दिला जाऊ शकतो.

Xiaomi redmi 10 will be the first smartphone to launch with mediatek helio g88 soc  | Xiaomi Redmi 10 च्या चिपसेटचा खुलासा; मीडियाटेकच्या नव्या गेमिंग चिपसेटसह येणार बाजारात 

Xiaomi Redmi 10 च्या चिपसेटचा खुलासा; मीडियाटेकच्या नव्या गेमिंग चिपसेटसह येणार बाजारात 

Next
ठळक मुद्दे Redmi 10 मध्ये मीडियाटेक हीलियो जी88 चिपसेट दिला जाऊ शकतो. मीडियाटेकचा हीलियो जी88 चिपसेट गेल्याच महिन्यात सादर केला गेला आहे.Xiaomi Redmi 10 मध्ये क्वॉड रियर कॅमेरा सेटअप मिळू शकतो.

Xiaomi ची रेडमी सीरिज स्वस्त स्मार्टफोन्ससाठी ओळखली जाते. गेले काही दिवस कंपनी आपला आगामी स्मार्टफोन Redmi 10 टीज करत आहे. कंपनीने सोशल मीडियाच्या माध्यमातून या स्मार्टफोनच्या काही स्पेसिफिकेशन्सची माहिती दिली आहे. आता शाओमीने रेडमी 10 च्या चिपसेटचा खुलासा केला आहे. कंपनीने सांगितले आहे कि हा स्मार्टफोन MediaTek Helio G88 चिपसेटसह लाँच केला जाईल. या चिपसेटसह येणारा हा जगातील पहिला स्मार्टफोन असू शकतो, कारण हा मीडियाटेकचा नवीन चिपसेट आहे.  

MediaTek Helio G88 SoC 

मीडियाटेकचा हीलियो जी88 चिपसेट गेल्याच महिन्यात सादर केला गेला आहे. या चिपसेटमध्ये 90 हर्ट्ज डिस्प्ले रिफ्रेश रेटची मर्यादा आहे. यातील ऑक्टा-कोर सीपीयूमध्ये दोन आर्म कॉर्टेक्स-ए75 सीपीयू 2.0GHz पर्यंतच्या स्पीडसह मिळतील. हीलियो जी88 सह येणाऱ्या फोनमध्ये 64 मेगापिक्सल पर्यंतचा मुख्य कॅमेरा, ड्युअल कॅमेरा बोकेह कॅप्चरसाठी हार्डवेयर डेप्थ इंजिन, कॅमेरा कंट्रोल यूनिट (सीपीयू), इलेक्ट्रोनिक इमेज स्टेब्लाइजेशन (ईआईएस) आणि रोलिंग शटर कम्पेशन (RSC) टेक्नॉलॉजी असे फिचर मिळतील. हीलियो जी88 मध्ये वॉयस असिस्टंट सर्विससाठी वॉयस वेकअप इंटीग्रेशन देण्यात येईल.   

हे देखील वाचा: 18GB रॅम, 6,000mAh बॅटरी आणि स्नॅपड्रॅगन 888+ प्रोसेसरसह दमदार ASUS ROG Phone 5S लाँच

Xiaomi Redmi 10 चे स्पेसिफिकेशन्स 

लिक्स आणि बातम्यांमधून रेडमी 10 चे काही स्पेसिफिकेशन्स लीक झाले आहेत. या फोनमध्ये 6.5-इंचाचा एलसीडी डिस्प्ले 90 हर्ट्ज रिफ्रेश रेट आणि 2400x1080 पिक्सल रिजोल्यूशनसह देण्यात येईल. वर सांगितल्याप्रमाणे Redmi 10 मध्ये मीडियाटेक हीलियो जी88 चिपसेट दिला जाऊ शकतो. या फोनमध्ये 6GB पर्यंतचा रॅम आणि 128GB पर्यंतची स्टोरेज मिळू शकते. हा रेडमी फोन अँड्रॉइड 11 आधारित मीयुआय 12.5 वर सादर केला जाईल.  

हे देखील वाचा: Mi Smarter Living 2022: Xiaomi चा भव्यदिव्य इव्हेंट; लाँच होऊ शकतात अनेक प्रोडक्टस

Xiaomi Redmi 10 मध्ये क्वॉड रियर कॅमेरा सेटअप मिळू शकतो. ज्यात एलईडी फ्लॅशसह 50 मेगापिक्सलचा मुख्य सेन्सर, 8 मेगापिक्सलची अल्ट्रा वाईड अँगल लेन्स, 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेन्स आणि 2 मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर असेल. हा रेडमी फोन 8 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करू शकतो. Redmi 10 मध्ये पावर बॅकअपसाठी 18वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीसह 5,000एमएएचची बॅटरी देण्यात येईल.  

Web Title: Xiaomi redmi 10 will be the first smartphone to launch with mediatek helio g88 soc 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.