लो बजेटमध्ये रियलमी मात देण्याची पुरेपूर तयारी; दमदार Redmi 10 येतोय भारतीयांच्या भेटीला
By सिद्धेश जाधव | Published: March 12, 2022 05:53 PM2022-03-12T17:53:01+5:302022-03-12T17:53:11+5:30
Xiaomi Redmi 10: लवकरच भारतात लो बजेट सेगमेंटमध्ये टिपस्टर Redmi 10 स्मार्टफोनची एंट्री होणार आहे. हा फोन याआधी जागतिक बाजारात Redmi 10C नावानं आला आहे.
Xiaomi Redmi 10 स्मार्टफोन पुढील आठवड्यात 17 मार्चला भारतात येणार आहे, अशी माहिती कंपनीनं दिली आहे. परंतु या स्मार्टफोनच्या स्पेसिफिकेशन्सची माहिती मात्र अजून समोर आली नाही. टिपस्टर पारस गुलगानीनं नायजेरियामध्ये लाँच झालेल्या Redmi 10C चा रिटेल बॉक्स रिव्हील केला आहे. तसेच दावा केला आहे कि हा Redmi 10 नावानं बजेट सेगमेंटमध्ये सादर केला जाईल. त्यामुळे आगामी Redmi 10 च्या स्पेसिफिकेशन्सची माहिती लाँचपूर्वीच लीक झाली आहे.
Redmi 10 चे स्पेसिफिकेशन्स
रेडमी 10 मध्ये 6.53 इंचाचा एलसीडी डिस्प्ले वॉटरड्रॉप नॉच डिजाईनसह देण्यात आला आहे. हा स्मार्टफोन अँड्रॉइड 10 आधारित मीयुआयवर चालतो. कंपनीनं यात ऑक्टाकोर प्रोसेसर दिला आहे, परंतु चिपसेटची माहिती मिळाली नाही. सोबत 4GB रॅम आणि 128GB स्टोरेज देण्यात आली आहे.
Redmi 10 च्या ट्रिपल कॅमेरा सेटअप मिळतो. ज्यात फ्लॅश लाईटसह 13 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर, 2 मेगापिक्सलचा सेकंडरी सेन्सर आणि 2 मेगापिक्सलचा थर्ड सेन्सर आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या फोनमध्ये 5 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे.बेसिक कनेक्टव्हिटीसह या फोनमध्ये फिजिकल फिंगरप्रिंट सेन्सरची सिक्योरिटी मिळाली आहे. पावर बॅकअपसाठी या नवीन रेडमी फोनमध्ये 5,000एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे. हा फोन Graphite Grey कलरमध्ये विकत घेता येईल.
Redmi 10 ची किंमत
नायजेरियामध्ये या फोनच्या 4GB RAM + 64GB मॉडेलची किंमत N78,000 (जवळपास 15,380 रुपये) आहे. तर 4GB RAM + 128GB मॉडेलसाठी N87,000 (जवळपास 17,155 रुपये) द्यावे लागतील. भारतात 17 मार्चला येणाऱ्या Redmi 10 ची किंमत 15 हजार रुपयांच्या आसपास असू शकते.
हे देखील वाचा:
- Flipkart Sale: 8 हजारांपेक्षा कमी किंमतीत 30 हजारांची Smart TV; पुन्हा मिळणार नाही अशी ऑफर
- हॉटेलच्या खोलीत किंवा चेंजिंग रूममध्ये आहे ‘छुपा कॅमेरा’? Oppo च्या ‘या’ फीचरपासून आता लपणार नाही
- चार्जिंगचं झंझट नाही! 10 दिवसांच्या बॅटरी लाईफसह परवडणाऱ्या किंमतीत Smartwatch भारतात लाँच