रियलमीचं टेन्शन वाढणार! Xiaomi पुन्हा लो बजेटमध्ये धुमाकूळ घालणार; Redmi 10A चे स्पेक्स आले समोर
By सिद्धेश जाधव | Published: February 12, 2022 12:13 PM2022-02-12T12:13:51+5:302022-02-12T12:14:39+5:30
Low Budget Smartphone Redmi 10A Launch: Redmi 10A हा शाओमीचा सर्वात स्वस्त स्मार्टफोन असू शकतो, हा फोन लवकरच लाँच केला जाऊ शकतो.
Low Budget Smartphone Redmi 10A Launch: Xiaomi नं नुकतीच आपल्या Redmi Note 11 सीरिजचे दोन स्मार्टफोन्स भारतात सादर केले आहेत. या सीरिजची किंमत 13,499 रुपयांपासून सुरु होत आहे. या सीरिजसाठी ग्राहक जेवढे उत्सुक होते त्या पेक्षा जास्त जास्त वाट Redmi 10 सीरिजच्या स्मार्टफोन्सची पहिली जात आहे. कारण ही कंपनीची सर्वात स्वस्त सीरिज आहे. काही दिवसांपूर्वी Redmi 10A वर कंपनी काम करत असल्याची बातमी आली होती. आता या सर्वात स्वस्त रेडमी स्मार्टफोनचे काही स्पेक्स समोर आले आहेत.
शाओमीनं मात्र अजूनही रेडमी 10ए बद्दल कोणतीही अधिकृत माहिती दिली नाही. परंतु विविध सर्टिफिकेशन्स साईट्सवर हा फोन लिस्ट झाला आहे. या लिस्टिंगमधून 220233L2 या मॉडेल नंबरची माहिती मिळाली आहे. तसेच लवकरच Redmi 10A स्मार्टफोन लवकरच लाँच केला जाईल, हे स्पष्ट झालं आहे.
Redmi 10A चे स्पेसिफिकेशन्स
रेडमी 10ए हा फोन अँड्रॉइड 11 ओएसवर लाँच केला जाईल. सोबत कंपनीचा युआय अर्थात मीयुआय देण्यात येईल. प्रोसेसिंगसाठी या रेडमी फोनमध्ये मीडियाटेकचा हीलियो जी25 चिपसेट दिला जाऊ शकतो. जो एक 4G चिपसेट आहे. लीक्स व सर्टिफिकेशन्सनुसार Redmi 10A स्मार्टफोन 2 जीबी रॅम, 3 जीबी रॅम आणि 4 जीबी रॅमसह लाँच केला जाईल. तसेच 32 जीबी स्टोरेज, 64 जीबी मेमरी तथा 128 जीबी स्टोरेज व्हेरिएंट देखील बाजारात उपलब्ध होतील.
हे देखील वाचा:
- रेकॉर्ड ब्रेक सेल करणारा Smartphone च्या भारतीय लाँचची तारीख ठरली; पाहा तुमच्या बजेटमध्ये आहे का किंमत
- 15 हजारांच्या आत येणाऱ्या ‘हे’ Realme स्मार्टफोन मिळतायत स्वस्तात; 6000mAh बॅटरी, 8GB रॅमवरही आहे डिस्काउंट