Xiaomi Redmi 7 लाँच होण्याआधीच स्पेसिफिकेशन झाले लिक
By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2018 01:14 PM2018-12-19T13:14:27+5:302018-12-19T13:32:08+5:30
शाओमीचा रेडमी 7 हा स्मार्टफोन लाँच होण्याआधीच लिक झाल्याची माहिती समोर आली आहे. चीनची सर्टिफिकेशन वेबसाईट टीनावर लिस्ट करण्यात आला आहे. फोटोवरून हँडसेटचे स्पेसिफिकेशन आणि महत्त्वाची माहिती लिक झाली आहे.
नवी दिल्ली - शाओमी ग्राहकांसाठी नेहमीच नवनवीन दर्जेदार स्मार्टफोन लाँच करत असते. याआधी शाओमीने आपला यशस्वी रेडमी नोट 5 प्रोला अपग्रेडेट करून रेडमी नोट 6 लाँच केला होता. त्यानंतर कंपनी आता रेडमी 6 ला अपग्रेडेड करून रेडमी 7 लाँच करण्याच्या तयारीत आहे. मात्र शाओमीचा रेडमी 7 हा स्मार्टफोन लाँच होण्याआधीच लिक झाल्याची माहिती समोर आली आहे. चीनची सर्टिफिकेशन वेबसाईट टीनावर लिस्ट करण्यात आला आहे. फोटोवरून हँडसेटचे स्पेसिफिकेशन आणि महत्त्वाची माहिती लिक झाली आहे.
टीना लिस्टिंगवरून फोनचे सर्व स्पेसिफिकेशनची माहिती मिळते. टीनावर मॉडल नंबर M1901F9T वर लिस्ट करण्यात आला आहे. फोनमध्ये 2.3 गीगाहर्ट्जचा ऑक्टो-कोर चिपसेट असणार आहे. लिस्टिंगनुसार, कंपनी येणाऱ्या हँडसेटला 11 वेगवेगळ्या रंगात लाँच करण्याची शक्यता आहे. याआधी अॅपलने iPhone XR ला 6 रंगात लाँच केले होते. शाओमी 11 रंगात फोन बाजारात उतरवणार असेल तर शाओमीच्या नावावर एक नवीन रेकॉर्ड जमा होणार आहे. हा मोबाइल ब्लॅक, पांढरा, ब्लू, रेड, पिवळा, पिंक, ग्रीन, गोल्ड, पर्पल, सिल्वर आणि ग्रे रंगात लाँच करण्यात येणार आहे.
रेडमी 7 ला 3जीबी/4जीबी/6जीबीच्या रॅमसोबत 32 जीबी/64 जीबी/128 जीबी इनबिल्ट स्टोरेजमध्ये लाँच करण्याची शक्यता आहे. टीनावर हा डिव्हाईस 5.84 एलसीडी डिस्प्लेसोबत लिस्ट करण्यात आले आहे. स्क्रीन (2280 X 1080 पिक्सल) रिझॉल्यूशन आहे. या स्मार्टफोनमध्ये 12 मेगापिक्सलचा रिअर कॅमेरा तर सेल्फीसाठी 8 मेगापिक्सलचा कॅमेरा दिला जाणार आहे. रेडमी 7 या फोनचं डायमेन्शन 147.7×71.9×7.8 मिलीमीटर तर या वजन 150 ग्रॅम असणार आहे. 24 डिसेंबर रोजी बीजिंगमध्ये एका कार्यक्रमात हा फोन लाँच करणार आहे.