"कितना कॉपी करोगे सर...;" Xiaomi, Realme मध्ये रंगलं ट्विटर वॉर
By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2021 04:49 PM2021-08-20T16:49:28+5:302021-08-20T16:54:36+5:30
Xiaomi Vs Realme Twitter War : सध्या भारतीय बाजारात Xiaomi आणि Realme च्या स्मार्टफोन्सचा दबदबा वाढला आहे. परंतु नव्या ऑफर्सवरून दोन्ही कंपन्यांमध्ये ट्विटरवर जुंपल्याचं पाहायला मिळालं.
Xiaomi आणि Realme या दोन कंपन्यांच्या स्मार्टफोन्सलाभारतीय बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात मागणी आहे. परंतु या दोन कंपन्या ऑफर्सवरून ट्विटरवर एकमेकांशी भिडल्याचं दिसून आलं. १८ ऑगस्ट रोजी शाओमी-रिअलमी बिझनेस डायरेक्टर स्नेहा तेनवाला (Sneha Tainwala) यांनी एक ट्वीट करत Xiaomi च्या Mi Fan Festival ला कॉपी केल्याचा आरोप केला. तसंच यावरून त्यांची खिल्लीही उडवली. याचं उत्तर देत रिअलमीचे चीफ मार्केटिंग ऑफिसर यांनी त्यांना तोंड बंद ठेवण्याचा सल्ला दिला.
स्नेहा तेनवाला यांनी रिअलमी इंडिया आणि युरोपचे मुख्य कार्यकारी अधिकारी माधव सेठ यांना टॅग करत एक ट्वीट लिहिलं. "शाओमीच्या फॅन फेस्टिव्हलची किती नक्कल करणार," असं त्या म्हणाल्या. इतकंच नाही तर त्यांनी यापुढे ROFL ईमोजीसोबत टोलाही लगावला. तसंच तुम्हाला आम्ही इव्हेंट पेजचं मॉकही पाठवू शकतो, यामुळे रिअलमीच्या टीमचा थोडा वेळ वाचेल असंही त्या म्हणाल्या.
Sigh.Can't believe this is coming out from a director of a proper brand.
— Francis Wong (@FrancisRealme) August 19, 2021
It's time for everyone to focus on their own business. keep our mouth shut and let products speak.
PS: Comments of that tweet made me understand how users gonna feel if your brand is talking like that. https://t.co/xvuHIcVLjk
रिअलमीकडूनही उत्तर
या ट्वीटला रिअलमी इंजिया आणि युरोपते चीफ मार्केटिंग ऑफिसर फ्रान्सिस वाँग यांनी उत्तर दिलं. तसंच एका चांगल्या ब्राँडचा डायरेक्टर असं ट्वीट करेल यावर आपल्याला विश्वास बसत नाही, असंही ते म्हणाले. "ही वेळ सर्वांनी आपल्या कामावर लक्ष केंद्रीत करण्याची आहे. दोन्ही कंपन्यांनी आपलं तोंड बंद ठेवलं पाहिजे आणि उत्तर देण्याची जबाबदारी प्रोडक्ट्सवर सोडली पाहिजे," असंही त्यांनी स्पष्ट केलं.