स्वस्तात शक्तिशाली स्पेक्ससाठी व्हा तयार; Xiaomi सादर करू शकते Redmi K50 series
By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2021 05:30 PM2021-10-04T17:30:40+5:302021-10-04T17:31:00+5:30
Redmi K50 Series Launch Date: शाओमी Redmi K50, Redmi K50 Pro आणि Redmi K50 Pro Plus असे तीन स्मार्टफोन व्हेरिएंट यावर्षीच्या अखेरपर्यंत सादर केले जाऊ शकतात.
शाओमी आपले कमी किंमतीती चांगले फीचर्स देण्यासाठी ओळखली जाणारी कंपनी आहे. कंपनीची रेडमी के सीरिज फ्लॅगशिप स्पेक्स कमी किंमतीती देण्यासाठी सादर केली जाते. आता आगामी Redmi K50 सीरीजच्या स्मार्टफोनची माहिती समोर येऊ लागली आहे. या सीरिजमध्ये Redmi K50, Redmi K50 Pro आणि Redmi K50 Pro Plus असे तीन स्मार्टफोन व्हेरिएंट यावर्षीच्या अखेरपर्यंत सादर केले जाऊ शकतात.
Redmi K50-सीरीजचे स्पेसिफिकेशन्स
एका चिनी टिपस्टरने Redmi K50 सीरीजच्या फोनचे काही स्पेसिफिकेशन्स शेयर केले आहेत. या लीकनुसार, हा स्मार्टफोन Qualcomm Snapdragon 870 5G प्रोसेसरसह सादर केला जाऊ शकतो. हा गेल्यावर्षीचा फ्लॅगशिप प्रोसेसर आहे. तसेच या रेडमीमध्ये 5,000mAh ची बॅटरी दिली जाऊ शकते. ही बॅटरी USB Type-C द्वारे 67W फास्ट चार्ज टेक्नॉलॉजीला सपोर्ट करेल.
या रेडमी स्मार्टफोनमध्ये 108MP चा प्रायमरी कॅमेरा दिला जाऊ शकतो. त्याचबरोबर 3X टेलीफोटो लेन्स आणि 20MP चा सेल्फी कॅमेरा मिळू शकतो. याव्यतिरिक्त इतर कोणत्याही कॅमेरा सेन्सरची माहिती अजून समोर आली नाही. या फोनमधील डिस्प्ले 1080 पिक्सल रिजोल्यूशनला सपोर्ट करेल. ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz असू शकतो. Redmi K50 सीरिजचे स्मार्टफोन भारतात पोको ब्रँड अंतर्गत सादर केले जाऊ शकतात, अशी चर्चा आहे.