Redmi Note 10 सीरिजमधील सर्वात स्वस्त स्मार्टफोन येणार भारतात; लाँच होण्याआधीच लीक झाली माहिती 

By सिद्धेश जाधव | Published: August 24, 2021 05:04 PM2021-08-24T17:04:29+5:302021-08-24T17:05:04+5:30

Xiaomi Redmi Note 10 Lite: कंपनी अजून एक नवीन स्मार्टफोन Redmi Note 10 Lite देखील भारतात सादर करण्याची योजना बनवत आहे. नावावरून हा स्मार्टफोन Redmi Note 10 सीरिजमधील छोटा आणि सर्वात स्वस्त स्मार्टफोन वाटत आहे.  

Xiaomi Redmi Note 10 Lite may launch in india | Redmi Note 10 सीरिजमधील सर्वात स्वस्त स्मार्टफोन येणार भारतात; लाँच होण्याआधीच लीक झाली माहिती 

हा फोटो Redmi Note 9 Pro चा आहे.

googlenewsNext

गेले काही दिवस Xiaomi च्या Redmi 10 Prime स्मार्टफोनची चर्चा भारतीय टेक वर्तुळात सुरु आहे. हा बजेट स्मार्टफोन 3 सप्टेंबरला भारतात सादर केला जाणार आहे. त्याचबरोबर आता अजून एका स्वस्त शाओमी स्मार्टफोनची माहिती समोर आली आहे. कंपनी अजून एक नवीन स्मार्टफोन Redmi Note 10 Lite देखील भारतात सादर करण्याची योजना बनवत आहे. नावावरून हा स्मार्टफोन Redmi Note 10 सीरिजमधील छोटा आणि सर्वात स्वस्त स्मार्टफोन वाटत आहे.  

टिप्सटर Kacper Skrzypek ने Redmi Note 10 Lite स्मार्टफोनच्या भारतीय लाँचची माहिती दिली आहे. शाओमी आपल्या रेडमी नोट 10 सीरीजमध्ये अजून एक नवीन डिवायस सादर करणार आहे. हा स्मार्टफोन रेडमी नोट 10 लाइट नावाने सादर केला जाईल, असे Kacper ने ट्विटरवरून सांगितले. 2109106A1I मॉडेल नंबर असलेला हा स्मार्टफोन Redmi Note 9 Pro आणि Redmi Note 9S चा रीब्रँडेड व्हर्जन असेल. जो फक्त भारतात Redmi Note 10 Lite म्हणून सादर करण्यात येईल. याबाबत कंपनीने कोणतीही अधिकृत माहिती दिली नाही.  

Redmi Note 9 Pro चे स्पेसिफिकेशन्स 

Redmi Note 9 Pro मध्ये 6.67-इंचाचा फुलएचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे. या डिस्प्ले मध्ये 1080x2400 रिजोल्यूशन आणि 20:9 आस्पेक्ट रेश्यो मिळतो. या फोनमध्ये कंपनीने स्नॅपड्रॅगन 720G ऑक्टा-चिपसेट दिला आहे. फोनमध्ये 6GB पर्यंत रॅम आणि 128GB पर्यंतची स्टोरेज देण्यात आली आहे. ही स्टोरेज माइक्रोएसडी कार्डच्या मदतीने 512GB पर्यंत वाढवता येते. हा फोन अँड्रॉइड 10 आधारित मीयुआयवर चालतो. 

फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये क्वॉड रियर कॅमेरा सेटअप मिळतो. ज्यात 48 मेगापिक्सलचा मुख्य सेन्सर, 8 मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाईड सेन्सर, 5 मेगापिक्सलचा मॅक्रो कॅमेरा आणि 2 मेगापिक्सलच्या चौथ्या सेन्सरचा समावेश आहे. या स्मार्टफोनमध्ये 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळतो. Redmi Note 9 Pro मधील 5,020mAh ची बॅटरी 18W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.  

Web Title: Xiaomi Redmi Note 10 Lite may launch in india

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.