महिनाभरात दुसऱ्यांदा वाढली Redmi Note 10 Pro ची किंमत; जाणून घ्या नवीन किंमत
By सिद्धेश जाधव | Published: July 5, 2021 01:00 PM2021-07-05T13:00:49+5:302021-07-05T13:04:30+5:30
Xiaomi Redmi Note 10 Pro Price: शाओमीने Xiaomi Redmi Note 10 Pro 6GB रॅम + 128GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 500 रुपयांनी वाढवली आहे.
गेल्या महिन्यात Xiaomi ने लोकप्रिय स्मार्टफोन Redmi Note 10 Pro ची किंमत 500 रुपयांनी वाढवली होती. आता पुन्हा एकदा या स्मार्टफोनची किंमत वाढवली आहे. महिनाभरात दुसऱ्यांदा Redmi Note 10 Pro ची किंमत वाढवण्यात आली आहे. जूनच्या आधी हा स्मार्टफोन 16,999 रुपयांमध्ये बाजारात उपलब्ध होता. (Redmi Note 10 Pro price in India increased again)
Xiaomi Redmi Note 10 Pro ची नवीन किंमत
शाओमीने 6GB रॅम + 128GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 500 रुपयांनी वाढवली आहे. गेल्या महिन्यात देखील याच व्हेरिएंटची किंमत 500 रुपयांनी वाढवण्यात आली होती. 16,999 रुपयांमध्ये लाँच झालेला हा व्हेरिएंट आता 17,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. याव्यतिरिक्त, फोनच्या 6 जीबी रॅम + 64 जीबी स्टोरेजची किंमत 15,999 रुपये आहे तर 8 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज मॉडेल 18,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल.
Xiaomi Redmi Note 10 Pro चे स्पेसिफिकेशन्स
शाओमी रेडमी नोट 10 प्रोमध्ये 6.67 इंचाचा मोठा फुलएचडी+ पंच-होल डिस्प्ले देण्यात आला आहे. गोरिल्ला ग्लास 5 प्रोटेक्शन असलेला हा डिस्प्ले 120हर्ट्ज रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. फोनमध्ये 5,020mAh ची बॅटरी 33W फास्ट चार्जिंग सपोर्टसह देण्यात आली आहे.
Xiaomi Redmi Note 10 Pro अँड्रॉइड 11 ओएससह लाँच झाला आहे. या फोनमध्ये क्वॉलकॉमचा स्नॅपड्रॅगन 732जी चिपसेट आणि एड्रेनो 618 जीपीयूला देण्यात आला आहे. फोटोग्राफीसाठी Xiaomi Redmi Note 10 Pro मध्ये क्वॉड रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यात 64 मेगापिक्सलचा मुख्य Samsung GW3 सेंसर देण्यात आला आहे. त्याचबरोबर हा स्मार्टफोन 5 मेगापिक्सलच्या सुपर मॅक्रो लेंस, 8 मेगापिक्सलच्या अल्ट्रा वाइड अँगल लेंस आणि 2 मेगापिक्सलच्या डेफ्थ सेंसरला सपोर्ट करतो. फोनच्या फ्रंट पॅनलवर 16 मेगापिक्सलचा सेल्फी शुटर आहे.