48MP कॅमेरा आणि 5000mAh बॅटरीसह Redmi Note 10T 5G लाँच; जाणून घ्या या दमदार फोनची किंमत
By सिद्धेश जाधव | Published: June 28, 2021 11:42 AM2021-06-28T11:42:29+5:302021-06-28T11:43:09+5:30
Redmi Note 10T 5G price: Redmi Note 10T 5G मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे. रेडमी नोट 10 सीरीजमधील हा सातवा स्मार्टफोन मिड रेंजमध्ये लाँच केला गेला आहे.
Xiaomi ने आपल्या लोकप्रिय Redmi Note 10 सीरिजमध्ये अजून एक नवीन स्मार्टफोन जोडला आहे. कंपनीने Redmi Note 10T 5G रशियात लाँच केला आहे. रेडमी नोट 10 सीरीजमधील हा सातवा स्मार्टफोन मिड रेंजमध्ये लाँच केला गेला आहे. या 5G स्मार्टफोनमध्ये Dimensity 700 SoC, 5000mAh ची बॅटरी आणि 48 मेगापिक्सलचा ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप असे स्पेक्स देण्यात आले आहेत. (Xiaomi Redmi Note 10T 5G launched with Dimensity 700 SOC and 5000mAh batterry)
Redmi Note 10T 5G चे स्पेसिफिकेशन्स
Redmi Note 10T 5G मध्ये कंपनीने 6.5-इंचाचा Full HD+ IPS LCD डिस्प्ले दिला आहे. हा डिस्प्ले 90Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. या फोनमध्ये MediaTek Dimensity 700 SoC देण्यात आला आहे. या स्मार्टफोनमध्ये Android 11 वर आधारित MIUI 12 देण्यात येईल. शाओमीच्या या स्मार्टफोनमध्ये 5000mAh ची बॅटरी आणि 18W फास्ट चार्जिंग देण्यात आली आहे.
Redmi Note 10T 5G मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे. या फोनमध्ये प्राइमरी कॅमेरा 48MP चा आहे. त्यासोबत 2 मेगापिक्सलचा डेप्थ आणि 2 मेगापिक्सलचा मॅक्रो कॅमेरा सेन्सर देण्यात आला आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या स्मार्टफोनमध्ये 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.
Redmi Note 10T 5G ची किंमत
Redmi Note 10T 5G चा एकमेव 4GB + 128GB स्टोरेज व्हेरिएंट रशियात 19,990 रुबल (अंदाजे 20,600 रुपये) की किंमतीत सादर केला गेला आहे. रेडमी का हा फोन ग्रीन, सिल्वर, ब्लॅक आणि ब्लू कलर ऑप्शनमध्ये सादर केला आहे.