Redmi Note 11 4G India: 50MP चा शानदार कॅमेरा असलेला स्वस्त रेडमी फोन येतोय भारतात; 90Hz रिफ्रेश रेट आणि 5000mAh सह होणार लाँच  

By सिद्धेश जाधव | Published: December 8, 2021 11:51 AM2021-12-08T11:51:22+5:302021-12-08T11:51:40+5:30

Redmi Note 11 4G India: Xiaomi चा Redmi Note 11 4G स्मार्टफोन लवकरच भारतीय बाजारात दाखल होणार आहे. या फोनमध्ये 6GB RAM, 5000mAh Battery, 90Hz Refresh Rate आणि 50MP कॅमेरा असे भन्नाट फीचर्स मिळतील.

Xiaomi Redmi Note 11 4G India Launch soon know specs Price sale offer  | Redmi Note 11 4G India: 50MP चा शानदार कॅमेरा असलेला स्वस्त रेडमी फोन येतोय भारतात; 90Hz रिफ्रेश रेट आणि 5000mAh सह होणार लाँच  

Redmi Note 11 4G India: 50MP चा शानदार कॅमेरा असलेला स्वस्त रेडमी फोन येतोय भारतात; 90Hz रिफ्रेश रेट आणि 5000mAh सह होणार लाँच  

googlenewsNext

Xiaomi नं आपली ‘रेडमी नोट 11’ सीरीज चीनमध्ये सादर केली आहे. या सीरिजमध्ये तीन 5G Phone सादर केल्यानंतर कंपनीनं Redmi Note 11 4G लाँच केला होता. आता हा स्वस्त फोन भारतीय बाजारात येणार आहे, अशी बातमी 91मोबाईल्सनं दिली आहे. हा फोन जागतिक बाजारात 6GB RAM, 5000mAh Battery, 90Hz Refresh Rate आणि 50MP कॅमेऱ्यासह लाँच झाला आहे.  

Redmi Note 11 4G India Launch

91मोबाईल्सच्या रिपोर्टनुसार, शाओमी भारतात Redmi Note 11 4G फोन सादर करणार आहे. या फोनची अचूक लाँच डेट समजली नाही परंतु व्हेरिएंटची माहिती मिळाली आहे. हा रेडमी फोन भारतात Graphite Gray, Twilight Blue आणि Star Blue कलरमध्ये उपलब्ध होईल. तर फोनचे तीन रॅम आणि स्टोरेज व्हेरिएंट देखील देशात येतील. ज्यात 4GB/64GB, 4GB/128GB आणि 6GB/128GB या व्हेरिएंट्सचा समावेश असेल.  

Redmi Note 11 4G ची किंमत  

Redmi Note 11 4G चे दोन रॅम व्हेरिएंट चीनमध्ये आले आहेत. यातील 4GB RAM आणि 128GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 999 युआन (सुमारे 11,600 रुपये) आहे. तर 6GB RAM आणि 128GB स्टोरेज व्हेरिएंटसाठी 1099 युआन (सुमारे 12,800 रुपये) मोजावे लागतील.  

Redmi Note 11 4G चे स्पेसिफिकेशन्स  

Redmi Note 11 4G मध्ये 6.5-इंचाचा डिस्प्ले मिळतो. हा एलसीडी डिस्प्ले फुलएचडी+ रिजोल्यूशन, 90हर्ट्ज रिफ्रेश रेट आणि 180हर्ट्ज टच सॅम्पलिंग रेटला सपोर्ट करतो. या फोनला मीडियाटेक हीलियो जी88 चिपसेटची प्रोसेसिंग पॉवर देण्यात आली आहे. त्याचबरोबर माली जी52 जीपीयू मिळतो. 6GB पर्यंत RAM आणि 128GB स्टोरेजसह येणारा रेडमी फोन अँड्रॉइड 11 ओएस आधारित मीयुआय 12.5 वर चालतो.   

फोनमधील ट्रिपल रियर कॅमेरा सेटअपमध्ये एलईडी फ्लॅश, 50 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर, 8 मेगापिक्सलची अल्ट्रा वाईड अँगल लेन्स आणि 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेन्स मिळते. Redmi Note 11 4G मधील फ्रंट कॅमेरा 8 मेगापिक्सलचा आहे. बेसिक कनेक्टिव्हिटी फीचर्ससह या ड्युअल सिम फोनमध्ये 3.5एमएम जॅक, आयआर ब्लास्टर आणि साईड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे. या डिवाइसमधील 5,000एमएएचची बॅटरी 18वॉट फास्ट चार्जिंग आणि 9वॉट रिवर्स चार्जिंगला सपोर्ट करते.   

Web Title: Xiaomi Redmi Note 11 4G India Launch soon know specs Price sale offer 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.