परडवणाऱ्या किंमतीत येणार का Xiaomi Redmi Note 11 आणि Note 11 Pro? लीक झाली किंमत
By सिद्धेश जाधव | Published: October 16, 2021 03:45 PM2021-10-16T15:45:59+5:302021-10-16T15:49:17+5:30
Xiaomi Redmi Note 11 Series Price and Launch: Xiaomi लवकरच Redmi Note 11, Redmi Note 11 Pro आणि Redmi Note 11 Pro Max असे तीन स्मार्टफोन सादर करणार आहे.
शाओमीच्या आगामी रेडमी नोट 11 च्या बातम्या येण्यास सुरुवात झाली नाही. या सीरीज अंतगर्त Redmi Note 11, Redmi Note 11 Pro आणि Redmi Note 11 Pro Max असे तीन स्मार्टफोन कंपनी सादर करू शकते. कंपनीने या रेडमी फोन्सबद्दल कोणतीही अधिकृत माहिती दिली नाही. परंतु लाँचपूर्वीच नवीन रेडमी नोट 11 आणि नोट 11 प्रो ची किंमत लीक झाली आहे.
Redmi Note 11 आणि Redmi Note 11 Pro ची किंमत
शाओमी रेडमी नोट 11 सीरीजमधील रेडमी नोट 11 स्मार्टफोनचे दोन व्हेरिएंट बाजारात येऊ शकतात. यातील 6GB रॅम आणि 128GB स्टोरेज असलेला मॉडेल 1199 युआन म्हणजे अंदाजे 14,000 रुपयांमध्ये सादर होईल. तर 8GB RAM आणि 128GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 1599 म्हणजे सुमारे 18,500 रुपये असू शकते.
रेडमी नोट 11 प्रो स्मार्टफोनचे तीन व्हेरिएंट बाजारात दाखल होऊ शकतात. यातील बेस व्हेरिएंट 6GB RAM आणि 128GB स्टोरेज व्हेरिएंट 1599 युआन (सुमारे ₹ 18,500) मध्ये सादर होईल. तर 8GB RAM आणि 128GB स्टोरेज व्हेरिएंट 1799 युआन (सुमारे ₹ 20,900) आणि 8GB RAM आणि 256GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 1999 युआन (सुमारे ₹ 23,300) च्या आसपास असू शकते.
Redmi Note 11 series चे संभाव्य स्पेसिफिकेशन्स
प्रसिद्ध टिपस्टर डिजिटल चॅट स्टेशनने रेडमी नोट 11 सीरिजचे स्पेक्स लीक केले आहेत. हे स्पेसिफिकेशन्स चिनी सोशल मीडिया साईट विबोवर शेयर करण्यात आले आहेत. त्यानुसार Redmi Note 11 series मधील टॉप अँड मॉडेल 120W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करू शकतो. म्हणजे Note 11 Pro आणि 11 Pro Max स्मार्टफोनमध्ये ही फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी मिळू शकते.
याआधीच्या Redmi Note 10 series मध्ये 120Hz रिफ्रेश रेट असलेला AMOLED डिस्प्ले देण्यात आला होता. त्यामुळे आगामी सीरिज देखील याच स्पेक्ससह बाजारात दाखल होऊ शकते. तसेच स्मार्टफोन बाजारातील सध्या स्थिती पाहता Redmi Note 11 series मधील स्मार्टफोन्स 5G कनेक्टिविटीसह सादर केले जाऊ शकतात.