Redmi Note 11 Series: नवीन प्रोसेसर आणि डिजाईनसह Xiaomi Redmi Note 11 सीरीज येणार भारतात; पुढील वर्षी होणार लाँच 

By सिद्धेश जाधव | Published: November 12, 2021 12:29 PM2021-11-12T12:29:26+5:302021-11-12T12:30:02+5:30

Xiaomi Redmi Note 11 Series Launch Date: Redmi Note 11 सीरीज चीनच्या बाहेर नव्या डिजाइन आणि Snapdragon चिपसेटसह सादर करण्यात येईल. तसेच डिजाईनमध्ये देखील मोठा बदल होऊ शकतो.

Xiaomi redmi note 11 series may launch in the global market with new design and snapdragon chipset  | Redmi Note 11 Series: नवीन प्रोसेसर आणि डिजाईनसह Xiaomi Redmi Note 11 सीरीज येणार भारतात; पुढील वर्षी होणार लाँच 

Redmi Note 11 Series: नवीन प्रोसेसर आणि डिजाईनसह Xiaomi Redmi Note 11 सीरीज येणार भारतात; पुढील वर्षी होणार लाँच 

Next

शाओमीने आपली बहुप्रतीक्षित Redmi Note 11 सीरिज चीनमध्ये सादर केली आहे. आता जगभरातील Xiaomi चे चाहते या सीरिजची आतुरतेने वाट बघत आहेत. परंतु चीनच्या बाहेर या सीरिजचे फक्त स्पेसीफिकेशन्स नाही तर डिजाईन देखील बदलणार आहे. आता व्हिएतनाममधील ThePIxel.vn वेबसाईटने Note 11 series च्या व्हिएतनाम आणि जागतिक बाजारातील लाँचची माहिती दिली आहे. या रिपोर्टनुसार, Redmi Note 11 सीरीज चीनच्या बाहेर नव्या डिजाइन आणि Snapdragon चिपसेटसह सादर करण्यात येईल.  

चीनमध्ये Redmi Note 11 मध्ये Dimensity 810 चिपसेट आणि Note 11 Pro व Pro+ स्मार्टफोन Dimensity 920 SoC सह आले होते. हे दोन्ही मीडियाटेकचे चिपसेटचे आहेत. परंतु जागतिक बाजारात Redmi Note 11 स्मार्टफोन Snapdragon चिपसेटसह सादर केला जाऊ शकतो, असा दावा वेबसाईटने केला आहे. तर हेच स्नॅपड्रॅगन चिपसेट असलेले फोन रीब्रँड करून चीनमध्ये सादर केले जातील.  

विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी Redmi Note 11 स्मार्टफोन भारतात Redmi Note 11T 5G नावाने सादर केली जाईल, अशी बातमी आली होती. तर Redmi Note 11 Pro आणि Pro+ स्मार्टफोन देसाहत Xiaomi 11i आणि Xiaomi 11i HyperCharge म्हणून रीब्रँड केले जातील. 

Redmi Note 11 Global Version 

Redmi Note 11 सीरिज पुढील वर्षी पहिल्या तिमाहीत जागतिक बाजारात उतरेल. या सीरिजमध्ये कंपनी Snapdragon 778G Plus आणि Snapdragon 695 चिपसेटचा वापर करू शकते. या बदलामागे चिप शॉर्टेज हे कारण असू शकते, असे एका टिपस्टरने सांगितले आहे.  

Web Title: Xiaomi redmi note 11 series may launch in the global market with new design and snapdragon chipset 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.